IPL Auction 2025 Live

ICC ने खेळाडूंसाठी एडवाइजरी जाहीर केली, लॉकडाउनमध्ये मॅच फिक्सर्सपासून सावधानतेचा दिला इशारा

भ्रष्टाचार युनिटचे प्रमुख अ‍ॅलेक्स मार्शल म्हणाले की भ्रष्टाचारी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधू शकतात. कोरोना विषाणूच्या साथीमुळे खेळ थांबने असल्याने फिक्सर्स अधिक सक्रिय झाले आहेत.

भारतीय क्रिकेट टीम (Photo Credit: Getty Images)

कोविड-19 च्या प्रसारामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. लॉकडाउनमुळे (Lockdown) जगातील एक तृतीयांश लोकसंख्या घरात कैद आहे. अशा परिस्थितीत आयसीसीने (ICC) सर्व क्रिकेटपटूंना मॅच फिक्सर्स आणि भ्रष्टांपासून सावध रहायला सांगितले आहे. भ्रष्टाचार युनिटचे प्रमुख अ‍ॅलेक्स मार्शल (Alex Marshall) म्हणाले की भ्रष्टाचारी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधू शकतात. कोरोना विषाणूच्या (Coronavirus) साथीमुळे खेळ थांबने असल्याने फिक्सर्स अधिक सक्रिय झाले आहेत आणि सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणाऱ्या क्रिकेटपटूंशी संबंध वाढवण्याच्या प्रयत्नात ते या वेळेचा उपयोग करीत असल्याचे मार्शल यांनी उघडकीस केले. कोविड-19 मुळे जगभरातील लाखो लोक मरण पावले आहेत. 'द गार्डियन'ने मार्शल यांचा हवाला देत म्हटले की, "आम्ही पाहत आहोत की खेळाडू सोशल मीडियावर पूर्वीपेक्षा जास्त वेळ घालवत आहेत, परंतु ज्ञात भ्रष्टाचारी या वेळी त्यांच्याशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करीत आहेत ज्याचा ते नंतर फायदा घेऊ शकतील." (कोरी अँडरसनने विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाची केली तुलना, म्हणाला दोघांच्या 'या' क्वालिटीमुळे टीम इंडियाला मिळतंय यश)

मार्शल म्हणाले की क्रिकेट थांबायचं अर्थ असा नाही की फिक्सिंगसाठी संपर्कांच्या घटना देखील कमी होतील. ते म्हणाले की कोविड-19 मुळे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट तात्पुरते थांबले असले तरी भ्रष्ट अजूनही कार्यरत आहेत. कोरोना विषाणूच्या साथीमुळे, मैदानावरील क्रिकेटचे कामकाज ठप्प झाले आहे आणि या गोष्टी कधी सामान्य होतील हे सांगता येत नाही. मार्शल म्हणाले की आम्ही आमच्या सदस्यांसह खेळाडूंना या समस्येची जाणीव करुन देण्यासाठी संपर्क साधला आहे, जेणेकरून प्रत्येकजण भ्रष्ट कनेक्टिव्हिटीच्या धोक्यांविषयी जागरूक होऊ शकेल.

दुसरीकडे, मार्शलच्या वक्तव्यावर बीसीसीआयचे अँटी करप्शन युनिट (एसीयू) प्रमुख अजित सिंह यांना ऑनलाईन भ्रष्टाचारी पध्दतींच्या धोक्यामुळे फारशी चिंता वाटत नाही. ते म्हणतात की, "भारतीय खेळाडू फिक्सर्सच्या कार्यप्रणालीविषयी चांगल्या प्रकारे परिचित आहेत आणि कोणत्याही संशयाची नोंद करण्यास तत्पर आहेत. "... सोशल मीडियाद्वारे लोक आपल्याकडे कसे येतात आणि मोडस ऑपरेंडीबद्दल आम्ही आमच्या खेळाडूंना जागरूक केले आहे. आम्ही त्यांना सांगितले आहे की हे (संभाव्य फिक्सर्स आणि सट्टेबाज) आपल्याकडे कसे येतील हे पहा," आयपीएस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. मॅच फिक्सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सर्वात मोठा शाप ठरला आहे. कोरोनाचा रोग संपल्यानंतर आणि सामान्य सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर अशी कोणतीही परिस्थिती उद्भवू नये अशी आशा आयसीसीने व्यक्त केली आहे.