ICC U19 Women's T20 World Cup Live Streaming: आयसीसी अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकाला आजपासून सुरुवात, भारतात कधी अन् कुठे घेणार थेट सामन्याचा आनंद; घ्या जाणून

भारताला यजमान मलेशिया, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजसह गट अ मध्ये स्थान देण्यात आले आहे. निकी प्रसादच्या नेतृत्वाखालील भारत रविवार, 19 जानेवारी रोजी क्वालालंपूरमधील बायुमास ओव्हल येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातून आपली मोहीम सुरू करेल.

U19 Women's T20 World Cup (Photo Credit - X)

ICC U19 Women's T20 World Cup Live Streaming: आयसीसी अंडर 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषक 2025 आज (शनिवार, 18 जानेवारी) पासून सुरू होत आहे, ज्यामध्ये 16 संघ सहभागी होत आहेत. भारताला यजमान मलेशिया, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजसह गट अ मध्ये स्थान देण्यात आले आहे. निकी प्रसादच्या नेतृत्वाखालील भारत रविवार, 19 जानेवारी रोजी क्वालालंपूरमधील बायुमास ओव्हल येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातून आपली मोहीम सुरू करेल. 2023 मध्ये इंग्लंडला हरवून भारत विजेता बनला आणि गतविजेता म्हणून या स्पर्धेत सहभागी होत आहे.

ग्रुप बी मध्ये इंग्लंड, आयर्लंड, पाकिस्तान आणि अमेरिका यांचा समावेश आहे. गट क मध्ये न्यूझीलंड, नायजेरिया, सामोआ आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. गट ड मध्ये ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेपाळ आणि स्कॉटलंड यांचा समावेश आहे. ग्रुप स्टेजचे सामने 23 जानेवारीपर्यंत खेळवले जातील, त्यानंतर सुपर सिक्सचे सामने 25 जानेवारीपासून सुरू होतील. यानंतर, उपांत्य फेरीचे सामने 31 जानेवारी रोजी खेळवले जातील आणि त्यानंतर अंतिम सामना 2 फेब्रुवारी रोजी क्वालालंपूरमधील बेयुमास ओव्हल येथे होईल.

हे देखील वाचा: WPL 2025 All Teams Full Squad: 'महिला प्रीमियर लीग'ला 14 फेब्रुवारीपासून होणार सुरूवात, सामन्यापूर्वी सर्व संघांचा संपूर्ण स्क्वॉड पाहा येथे

भारतात कुठे पाहणार सामन्याचे थेट प्रेक्षेपण

2025 च्या अंडर 19 महिला टी-20 विश्वचषकातील सामने भारतीय वेळेनुसार सकाळी 8.00 आणि दुपारी 12.00 वाजता सुरू होतील. तसेच अंडर 19 महिला टी-20 विश्वचषकाचे प्रसारण हक्क स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. सर्व सामने स्टार स्पोर्ट्स 2 (एचडी+एसडी) आणि स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी (एचडी+एसडी) वर प्रसारित केले जातील.

अंडर 19 महिला भारतीय संघ

भारत: निकी प्रसाद (कर्णधार), सानिका चालके, जी त्रिशा, कमलिनी जी, भाविका अहिरे, ईश्वरी अवसरे, मिथिला विनोद, जोशिता व्हीजे, सोनम यादव, पारुनिका सिसोदिया, केसरी दृथी, आयुषी शुक्ला, आनंदिता किशोर, एमडी शबनम, वैष्णवी एस.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Tags

Australia bangladesh Bangladesh Under19 national cricket team Bangladesh Women's National Under-19 Cricket Team England England Under19 national cricket team England Women's National Under-19 Cricket Team ICC ICC U19 Women's T20 World Cup ICC U19 Women's T20 World Cup 2025 ICC U19 Women's T20 World Cup 2025 Live Streaming ICC U19 Women's T20 World Cup 2025 Live Telecast ICC U19 Women's U19 T20 World Cup 2025 ICC Under-19 Women's T20 World Cup India India Under-19 National Cricket Team India women's U19 cricket team India Women’s National Under-19 Cricket Team indian team Indian Under19 national cricket team International Cricket Council Ireland Ireland Under19 national cricket team MALAYSIA Malaysia Under19 national cricket team Malaysia Women's National Under-19 Cricket Team Nepal Nepal Under19 national cricket team New Zealand New Zealand Under19 national cricket team NIGERIA Nigeria Under19 national cricket team Pakistan Pakistan Under19 national cricket team Pakistan Women's National Under-19 Cricket Team Samoa Samoa Under19 national cricket team Samoa Women's National Under-19 Cricket Team Scotland Scotland Under19 national cricket team Scotland Women's National Under-19 Cricket Team South Africa South Africa Under19 national cricket team Sri Lanka Sri Lanka Under19 national cricket team Sri Lanka Women’s National Under-19 Cricket Team U19 Women's T20 World Cup U19 Women's T20 World Cup 2025 U19 Women's T20 World Cup 2025 Schedule USA USA Under19 national cricket team USA Women's National Under-19 Cricket Team West Indies West Indies Under19 cricket team West Indies Women's Under-19 Cricket Team आयर्लंड इंग्लंड दक्षिण आफ्रिका नायजेरिया नेपाळ न्यूझीलंड पाकिस्तान बांगलादेश भारतीय संघ मलेशिया यूएसए वेस्ट इंडीज श्रीलंका सामोआ स्कॉटलंड


Share Now