ICC Test Rankings: कसोटी क्रमवारीत Steve Smith पुन्हा बनला नंबर-1 फलंदाज, जाणून घ्या केन विल्यमसन-विराट कोहली यांची रँकिंग

स्मिथने न्यूझीलंड कर्णधार केन विल्यमसनला दुसऱ्या स्थानी ढकलत पहिले स्थान काबीज केले.

स्टीव्ह स्मिथ (Photo Credit: Getty Images)

आयसीसीने (ICC) नुकतंच खेळाडूंची ताजी कसोटी क्रमवारी झाली आहे. बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसी कसोटी क्रमवारीत (ICC Test Rankings) ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) अव्वल स्थान मिळवले तर भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यापूर्वी चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. स्मिथने न्यूझीलंड कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) दुसऱ्या स्थानी ढकलत पहिले स्थान काबीज केले. शिवाय, शुक्रवारी साऊथॅम्प्टन येथील हॅम्पशायर बाउल (Hampshire Bowl) येथे न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात भारताचे नेतृत्व करणाऱ्या कोहलीचे 814 गुण आहेत. तसेच, टॉप-10 फलंदाजांमध्ये टीम इंडियाचे रिषभ पंत आणि रोहित शर्मा यांचाही समावेश आहे. पंत आणि रोहितचे प्रत्येकी 747 गुण असून दोघे संयुक्तपणे सहाव्या स्थानावर आहे. (Test Team Rankings: ‘विराटसेने’चा सलग पाचव्या वर्षी ICC टेस्ट क्रमवारीत दबदबा पण ‘या’ विश्वविजयी टीमने 7 वर्ष गाजवलं आहे अधिराज्य)

गेल्या वर्षी बॉक्सिंग डे कसोटीनंतर स्मिथने पहिल्यांदा अव्वल स्थानावर दावा ठोकला. इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर बसलेला किवी कर्णधार स्मिथच्या 891 गुणांच्या फक्त पाच गुणांनी पिछाडीवर आहे. अशास्थितीत जगादीक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात प्रभावी कामगिरी करत विल्यमसन पुन्हा पहिले स्थान पटकावू शकतो. कसोटी गोलंदाजीच्या क्रमवारीत भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सच्या मागे दुसरे स्थान कायम राखले आहे. विशेष म्हणजे अश्विन पहिल्या दहा गोलंदाजांमध्ये एकमेव भारतीय आहे. दुसरीकडे, वेस्ट इंडीजच्या जेसन होल्डर 412 रेटिंगसह कसोटी अष्टपैलू क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान आहे. भारताचा रवींद्र जडेजा आणि अश्विन अनुक्रमे दुसर्‍या व चौथ्या क्रमांकावर आहेत.

तसेच वेगवान किवी गोलंदाज मॅट हेन्रीच्या इंग्लंडविरुद्ध सामन्यातील कामगिरीने त्याला कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट 64व्या स्थान मिळवून दिले आहेत तर अजाज पटेलही 323 च्या कारकीर्दीतील उच्च स्थानावर पोहचला आहे. डेव्हन कॉनवे आपल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर संयुक्तपणे 61 व्या स्थानावर आहे. इंग्लंडचा दुसरा डाव घरातील न्यूझीलंडविरुद्ध त्यांची सर्वात छोटी धावसंख्या होतु परंतु पहिल्या डावात डॅन लॉरेन्सच्या नाबाद 81 धावांच्या खेळीने त्याला 16 स्थानांचा फायदा करून दिला आणि त्याने कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट 396 गुणांची कमाई केली.