ICC Test Rankings: आयसीसीची कसोटी क्रमवारीत चेतेश्वर पुजाराला मिळाली बढती; विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रविंद्र जाडेजाचे स्थान कायम

ज्यात पाकिस्तानविरूद्ध दमदार गोलंदाजी करणाऱ्या जेम्स अँडरसनची दीर्घ काळानंतर जागतिक कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत पहिल्या दहामध्ये ‘एन्ट्री’झाली आहे.

Cheteshwar pujra, Virat Kohli, Jasprit Bumrah, Ravindra Jadeja (Photo Credit: Twitter)

नुकतीच आयसीसीने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रमवारीका (ICC Test Rankings) जाहीर केली आहे. ज्यात पाकिस्तानविरूद्ध दमदार गोलंदाजी करणाऱ्या जेम्स अँडरसनची दीर्घ काळानंतर जागतिक कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत पहिल्या दहामध्ये ‘एन्ट्री’झाली आहे. तसेच यादीत भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजाराला बढती मिळाली आहे. फलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा बेन स्टोक्स स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे क्रमवारीत एका स्थानाने खाली घसरला आहे. तो आठव्या स्थानी गेला असून पुजाराने त्याच्या जागी सातवे स्थान पटकावले आहे. तर, भारताचा कर्णधार विराट कोहली, जसप्रीत बुमराह, अजिंक्य रहाणे, रविंद्र जाडेजा यांचे स्थान कायम आहे.

फलंदाजाच्या क्रमवारीत विराट कोहलीने 886 गुणांसह आपले दुसरे स्थान राखून ठेवले आहे. तर, अजिंक्य राहाणे 726 गुणांसह दहाव्या स्थानी आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ 911 गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे. गोलंदाच्या क्रमवारीत भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह 779 गुणांसह नवव्या स्थानी कायम आहे. तर, ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पॅट कमिन्सने 904 गुणांसह अव्वल राखून ठेवले आहे. हे देखील वाचा- James Anderson Take 600 Wickets in Tests: इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये 600 बळींचा टप्पा गाठला; सचिन तेंडूलकर, विराट कोहली, अनिल कुंबले यांच्यासह क्रीडाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव

आयसीसीचे ट्वीट-

आयसीसीचे ट्वीट-

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतदेखील बेन स्टोक्सला अव्वल स्थान गमवावे लागले आहे. त्याच्याजागी वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याने अव्वलस्थान परत मिळवले आहे. याशिवाय इंग्लंडच्या ख्रिस वोक्सने ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला एका स्थानाने खाली ढकलत सातवे स्थान पटकावले आहे. भारताचे रविंद्र जाडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे दोघे अनुक्रमे तिसऱ्या आणि पाचव्या स्थानी कायम आहेत.