ICC T20I Rankings: इंग्लंड बनली No 1 टी-20 टीम, डेविड मलानने मिळवले टी-20 इतिहासातील सर्वाधिक रेटिंग गुण

यापूर्वी टी-20 रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलिया अव्वल होता. डेविड मलानने आयसीसी पुरुषांच्या टी-20 प्लेयर रँकिंगमध्ये सर्वाधिक रेटिंग मिळवली आहे. मालनने 915 गुण गाठले आहेत. मालनने आता पाकिस्तानच्या बाबर आझमवर 44-गुणांची आघाडी घेतली आहे.

डेविड मालन (Photo Credit: Twitter/ICC)

ICC T20I Rankings: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध (South Africa) नुकत्याच संपुष्टात आलेल्या टी-20 मालिकेत इंग्लंडने (England) वर्चस्व गाजवत शानदार विजय नोंदवला. केप टाऊनच्या न्यूलँड्स येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने 9 विकेट्सने विजय मिळविला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (International Cricket Council) ताज्या जाहीर झालेल्या क्रमवारीत इंग्लंड आता नंबर वन टी-20 संघ (T20I Team Rankings) बनला आहे. यापूर्वी टी-20 रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलिया अव्वल होता. या विजयानंतर इंग्लंड संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने जाहीर केलेल्या टी-20 रँकिंगमध्ये अव्वल स्थान गाठले. 25 सामन्यांनंतर आता इंग्लंडचे एकूण 275 रेटिंग गुण झाले आहेत. ऑस्ट्रेलियानेही (Australia) 22 सामन्यांत इतकेच रेटिंग गुण आहेत, मात्र इंग्लंडने 6877 तर ऑस्ट्रेलियाने 6047 गुण मिळवले आहेत.

भारतीय संघाचे एकूण 266 रेटिंग गुण असून ते या यादीत तिसर्‍या स्थानावर आहेत. चौथ्या क्रमांकावर पाकिस्तानचे 262 रेटिंग आहे. दक्षिण आफ्रिका पाचव्या क्रमांकावर असून इंग्लंडविरुद्ध टी-20 मध्ये त्यांना क्लीन स्वीपला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघात टी-20 मालिका सुरु होणार असून अखेरीस रँकिंगमध्ये काही बदल पाहायला मिळू शकतात. दुसरीकडे, डेविड मलान (Dawid Malan) इंग्लंडच्या विजयाचा नायक ठरला. या कामगिरीमुळे अव्वल फळीतील फलंदाजाला आयसीसी पुरुषांच्या टी-20 प्लेयर रँकिंगमध्ये सर्वाधिक रेटिंग मिळाली आहे. त्याने मालिकेत 173 धावा केल्या ज्या इंग्लंडची महत्तवपूर्ण ठरली. 33-वर्षीय मालनने 915 गुण गाठले आहेत. 900 टी-20 गुणांचा टप्पा गाठणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच पहिला खेळाडू होता ज्याने 2018 मध्ये ही कामगिरी केली होती. मालनने आता पाकिस्तानच्या बाबर आझमवर 44-गुणांची आघाडी घेतली आहे ज्याला त्याने यावर्षी सप्टेंबरमध्ये महिन्यात अव्वल स्थान मिळवण्याच्या शर्यतीत मागे टाकले होते.

शिवाय, इंग्लंडच्या जोस बटलरने सात स्थानाची झेप झेट 21वे स्थान गाठले तर दक्षिण आफ्रिकेचा रासी व्हॅन डर ड्यूसेनने आपला शानदार फॉर्म कायम ठेवत संपूर्ण मालिकेत 136 धावा केल्या ज्यामुळे त्याने रँकिंगमध्ये 17 स्थानांची झेप घेत कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट पाचवे स्थान गाठले. मालिकेत फॅफ डू प्लेसिस देखील फॉर्ममध्ये परतला ज्याने त्याने पहिल्या 20 मध्ये स्थान मिळवून दिले. गोलंदाजांपैकी इंग्लंडचा लेगस्पिनर आदिल रशीदने चौथे स्थान पटकावले. अव्वल सात गोलंदाज हे सर्व फिरकीपटू असून दक्षिण आफ्रिकेचा अव्वल क्रमांकाचा गोलंदाज तबरेझ शम्सी 5व्या स्थानावर आहे.