ICC T20 World Cup 2021: भारतात पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपचे अनावरण, BCCI अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले- ‘21 ही भारताची वेळ आहे’

गुरुवारी माजी कर्णधाराने बीसीसीआय सचिव जय शाह यांच्यासमवेत विश्वचषक ट्रॉफीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. गांगुलीने ट्विट केले की, “21 आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताची वेळ आली आहे.”

सौरव गांगुली आणि जय शाह (Photo Credits: Instagram)

ICC T20 World Cup 2021: आयसीसी पुरूष टी-20 वर्ल्ड कप (Men's T20 World Cup) 2021 चे यंदा भारतात (India)आयोजन केले जाणार असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) निश्चितच उत्साहित आहेत. गुरुवारी माजी कर्णधाराने बीसीसीआय (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांच्यासमवेत विश्वचषक ट्रॉफीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. गांगुलीने ट्विट केले की, “21 आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताची वेळ आली आहे.” पुरुषांच्या टी -20 वर्ल्ड कपची ही सातवी आवृत्ती आहे. यावर्षीच्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषक (Women's T20 World Cup) स्पर्धेनंतर हा पहिला जागतिक क्रिकेट स्पर्धा होईल. यंदा फेब्रुवारी-मार्च महिन्यात ऑस्ट्रेलिया येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मेलबर्न क्रिकेट मैदानावर झालेल्या या अंतिम सामन्यात विक्रमी 86,174 प्रेक्षकांनी ऑस्ट्रेलिया-भारत यांच्यातील फायनल सामन्यात उपस्थिती दर्शवली होती. (IPL 2021: आयपीएलच्या पुढच्या पर्वात आणखी एका नव्या संघाची भर पडण्याची शक्यता, नवव्या संघासाठी BCCI तयारी करत असल्याचे वृत्त)

दरम्यान, 2021 ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान 16 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, इंग्लंड, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज व्यतिरीक्त पापुआ न्यू गिनी, नामिबीया, नेदरलँड, ओमान आणि स्कॉटलंड या देशांमधील संघांचाही समावेश आहे. रोनामुळे ऑस्ट्रेलियात होणारे टी-20 वर्ल्ड कप परिस्थिती लक्षात घेता पुढे ढकलण्यात आले, त्यामुळे 2020 ऐवजी 2022 स्पर्धेचं यजमानपद हे ऑस्ट्रेलियाला मिळणार आणि भारतात नियिजोत वेळेनुसार 2021 मध्ये टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन होणार असल्याचं आयसीसीने यापूर्वीच स्पष्ट केलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by SOURAV GANGULY (@souravganguly)

शिवाय, कोरोना काळात स्पर्धेचे आयोजन होणार असल्याने पुढील वर्षी सुरक्षित आणि निरोगी आयसीसी टी -20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी बीसीसीआय कटिबद्ध आहे आणि त्याच्या प्रयत्नात “कोणतीही कसर सोडणार नाही”, असे बोर्डचे सचिव जय शाह यांनी आयसीसीच्या एका निवेदनात म्हटले. मंडळाच्या सचिवांनी आश्वासन दिले की सर्व 15 संघांना भारताच्या आदरातिथ्यची चव चाखायला मिळेल. “आम्ही क्रिकेट पाहण्याचा समृद्ध अनुभव देण्याचा निर्धार केला आहे, पण आयसीसी आणि सदस्य बोर्डाला मी हे सांगू इच्छितो की भारत आपल्या अतिथीच्या आदरातिथ्यासाठी ओळखला जातो आणि आम्ही तुम्हाला घरी आहात असे जाणवून देऊ.”