IPL Auction 2025 Live

ICC World Cup 2019 मध्ये सामन्याआधी टीम इंडिया चा इंग्लंड ला दिला दणका, ODI Ranking मध्ये पटकावले पाहिले स्थान

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीनुसार इंग्लंडची दुसऱ्या स्थानी घसरण झाली असून भारतीय संघ अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.

(Photo Credits: IANS)

आयसीसी (ICC) विश्वकप मध्ये सलग तीन पराभवामुळे यजमान इंग्लंड (England) चे उपांत्य फेरीतील स्थान धोक्यात आहे. मात्र, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वनडे क्रमवारीतील अव्वल स्थानही त्यांनी गमवावे आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीनुसार इंग्लंडची दुसऱ्या स्थानी घसरण झाली असून भारतीय संघ अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. टीम इंडिया 123 गुणांसह अव्वल स्थानी पोहोचला आहे, तर इंग्लंड संघाला दोन गुणांचा तोटा सहन करावा लागला आहे. त्यांच्या खात्यात 122 गुण आहेत. (ICC World Cup 2019: Team India च्या ऑरेंज जर्सी वरून राजकारण, 'नरेंद्र मोदींचा देशाला भगवा रंग देण्याचा प्रयत्न'; ICC ने केले विधान)

विश्वकपमध्ये इंग्लंडच्या कामगिरीबद्दल बोलले तर संघाला सलग तिसरा राभवा पत्करावा लागला. इंग्लंड संघ पाकिस्तान (Pakistan), श्रीलंका (Sri Lanka) व ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्या विरुद्ध सामन्यात पराभव सहन करावा लागला. सात सामन्यानंतर त्यांच्या खात्यात 8 गुण जमा आहेत आणि उर्वरित दोन सामन्यात त्यांना भारत (India) व न्यूझीलंड (New Zealand) या तगड्या प्रतिस्पर्धींचा सामना करावा लागणार आहे. इंग्लंड-भारत मधील विश्वकप सामना 30 जूनला बर्मिंगहॅम येथे खेळाला जाईल.

विश्वकप च्या सेमीफाइनलमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी इंग्लंड ला हे दोन्ही सामने जिंकावे लागणार आहे. दुसरीकडे भारतीय संघ पाच सामन्यांत ( 4 विजय व 1 अनिर्णीत) 9 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड दोन गुणांची कमाई करून ( 116 गुण) तिसऱ्या स्थानी कायम आहे, तर दक्षिण आफ्रिकेची घसरण झाली असून ऑस्ट्रेलिया तीन गुणांच्या कमाईसह ( 112 गुण) चौथ्या स्थानी आले आहेत.

यंदा ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम सेमीफायनल मध्ये जागा मिळवली आहे. तर न्यूझीलंड आणि भारत या दोन संघाचा प्रवेश निश्चित आहे, परंतु चौथ्या स्थानासाठी तीन संघात चांगली स्पर्धा रंगली आहे.