ICC ने केली U19 वर्ल्ड कप इलेव्हनची घोषणा; यशस्वी जयस्वाल समवेत 3 भारतीय खेळाडूंचा समावेश, एकाही पाकिस्तानी खेळाडूला मिळाले स्थान
रविवारी दक्षिण आफ्रिकेच्या पोचेफस्ट्रम येथे झालेल्या आयसीसी अंडर-19 विश्वचषकच्या अंतिम सामन्यात भारताला बांग्लादेशविरुद्ध तीन विकेटने पराभव पत्करावा लागला होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने अंडर-19 विश्वचषक (U19 World Cup) टूर्नामेंटची टीम घोषित केली असून तीन भारतीय (India) खेळाडूंचा संघात समावेश केला आहे. रविवारी दक्षिण आफ्रिकेच्या पोचेफस्ट्रम येथे झालेल्या आयसीसी अंडर-19 विश्वचषकच्या अंतिम सामन्यात भारताला बांग्लादेशविरुद्ध तीन विकेटने पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान, बांग्लादेशने पहिल्यांदा आयसीसी स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे. तीन भारतीय खेळाडूंमध्ये सलामी फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal), लेगस्पिनर रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) आणि वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी (Kartik Tyagi) यांचा आयसीसीने समावेश आहे. जयस्वालला वर्ल्ड कपमधील प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून निवडले गेले. जयस्वालने त्याने अंतिम सामन्यात 88 धावा केल्या, शिवाय स्पर्धेच्या सहा डावांमध्ये 133 च्या सरासरीने 400 धावा केल्या. दुसरीकडे, बिश्नोईने स्पर्धेत सर्वाधिक 17 विकेट्स घेतल्या. त्याने अंतिम सामन्यात 30 धावा देऊन चार गडी बाद केले होते. बिश्नोईशिवाय वेगवान गोलंदाज त्यागीलाही यात स्थान देण्यात आले आहे. त्यागीने विश्वचषकमध्ये एकूण 11 विकेट्स घेतल्या. (U-19 World Cup Final: भारत-बांगलादेश खेळाडूंना ICC कडून दे धक्का, फायनलनंतर आचार संहितेचे उल्लंघन केल्याबद्दल मानले दोषी)
या स्पर्धेच्या अधिकृत संघात अफगाणिस्तानचा सलामीवीर इब्राहिम जादरान आणि वेस्ट इंडिजचा नईम यंग सारख्या खेळाडूंचा समावेश आहे. बांग्लादेशच्याही तीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यात कर्णधार अकबर अली, शहादत हुसेन आणि महमूदुल हसन जॉय यांनाही स्थान देण्यात आले आहे. या संघात अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजमधील प्रत्येकी दोन खेळाडू आहेत. कॅनडाच्या अकील कुमारचा 12 वा खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आयसीसीच्या या टीममध्ये एकही पाकिस्तानी (Pakistan) खेळाडूचा समावेश झाला नाही. विश्वचषक सेमीफायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा 10 विकेटने धुव्वा उडवला आणि फायनलमध्ये स्थान निश्चित केले होते. आयसीसीचे प्रतिनिधी मेरी गॉडबीर, इयान बिशप, रोहन गावस्कर आणि ईएसपीएन क्रिकइन्फोची बातमीदार श्रेष्ठ शाह यांच्यासह नटाली जर्मनोस व्यतिरिक्त पाच सदस्यीय समितीने या संघाची निवड केली.
आयसीसी अंडर-19 विश्वचषक स्पर्धेचा संघ (फलंदाजीच्या क्रमात)
यशस्वी जयस्वाल- भारत
इब्राहिम जादरान- अफगानिस्तान
रविन्दु रसन्था - श्रीलंका
महमूदुल हसन जॉय - बांग्लादेश
शहादत हुसैन - बांग्लादेश
नईम यंग - वेस्ट इंडीज
अकबर अली - बांग्लादेश (विकेटकीपर, कॅप्टन)
शफीकुल्लाह गफरी - अफगानिस्तान
रवि बिश्नोई - भारत
कार्तिक त्यागी - भारत
जायदेन सील - वेस्टइंडीज
अकील कुमार - कनाडा: 12वां खिलाड़ी