ICC Cricket World Cup 2019: विश्वचषकासाठी भारतीय संघ सज्ज, टीम इंडियाचे खेळाडू फॉर्ममध्ये; कर्णधार विराट कोहली याची रवी शास्त्री यांच्यासोबत पत्रकार परिषद

कोणताही संघ कोणत्याही संघाला पराभूत करु शकतो, अशा स्थितीत आहे. या वेळचा वर्ल्डकप हा केदार जाधव याच्यासाठी मोठी संधी असल्याचे शास्त्री म्हणाले.

Virat Kohli and Ravi Shastri | (Photo Credits: Twiteer/ANI)

ICC Cricket World Cup 2019: कोणालीही कमी लेखणार नाही. दमदार कामगिरी करत राहणार, असे सांगत आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2019 साठी टीम इंडिया सज्ज असल्याचे विराट कोहली (Virat Kohli) म्हणाला. भारतीय क्रिकेट संघ (India World Cup Squad) विश्वचषक स्पर्धा 2019 साठी इग्लंडला निघाला आहे. या पार्श्वभूमीवर कर्णधार विराट कोहली आणि भारतीय क्रिकेट संघ प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2019 साठी भारतीय खेळाडूंनी जय्यद तयारी केली आहे. इतकेच नव्हे तर संघातील सर्व खेळाडू हे पूर्णपणे फॉर्ममध्ये आहेत असेही विराट म्हणाला. पुढे बोलताना विराटने सांगितले की, विश्वचषक स्पर्धेला सामोरे जाताना जगभरातील चाहत्यांचा दबाव सांभाळणे ही खूप मोठी गोष्ट आहे. आमचे सर्व गोलंदाज हे जबरदस्त आहेत. यातील कोणताच गोलंदाज थकलेला नाही, असेही विराट म्हणाला. (हेही वाचा, ICC World Cup 2019: केदार जाधव फिटनेस टेस्टमध्ये पास झाल्याने वर्ल्ड कपसाठी भारताच्या संघासोबत इंग्लडला जाणार)

एएनआ ट्विट

दरम्यान, प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी सांगितले की, वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वच संघ दमदार आहेत. कोणताही संघ कोणत्याही संघाला पराभूत करु शकतो, अशा स्थितीत आहे. या वेळचा वर्ल्डकप हा केदार जाधव याच्यासाठी मोठी संधी असल्याचे शास्त्री म्हणाले.