ICC World Cup 2019: IND vs WI मॅचमध्ये स्वस्तात आऊट झाल्याने विजय शंकर परत एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर
तर रिषभ पंतला किंवा दिनेश कार्तिकला संधी देण्याची चर्चा सुरु झाली.
भारत (India) विरुद्ध वेस्ट इंडिज (West Indies) विश्वकप मधील सामना साधा मॅन्चेस्टर (Manchester) येथील ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) मैदानात सुरु आहे. पहिले फलंदाजी करत भारताने विजयासाठी वेस्ट इंडिज समोर 269 दहावीचे आव्हान दिले. टीम इंडिया कडून कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि माजी कर्णधार एम एस धोनी (MS Dhoni) ने सर्वाधिक धावा केल्या. मात्र, मॅचमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष लागून होते ते अष्टपैलू विजय शंकर (Vijay Shankar) वर. के एल राहुल (KL Rahul) बाद होताच विजय कोहलीला साथ देण्यासाठी मैदानात उतरला. मात्र, तो जास्त काळ कोहली ला साथ देऊ शकला नाही आणि कमर रोच (Kemar Roach) च्या बॉलिंग वर आपली विकेट गमावली. विजय ने 19 चेंडूत 14 धावा केल्या. (World Cup 2019:ऑस्ट्रेलियन फॅन ने संजय मांजरेकर वर लावला पक्षपाताचा आरोप, ICC कडे केली तक्रार)
विजय शंकर ची पुन्हा एकदा निराशाजनक खेळी बघून सोशल मीडियावर रिषभ पंत (Rishabh Pant) ला किंवा दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) ला संधी देण्याची चर्चा सुरु झाली. काही युसर्स ने तर विजय आणि demonetisation ची तुलना ही केली.
Demonetisation नंतर विजय शंकरला संधी देणे हा चुकीचा निर्णय आहे
BCCI निवड समितीने विजया शंकरला ऑलराउंडर म्हणून, 3 डी माणूस म्हणून घेतले परंतु संघ व्यवस्थापनाने त्याला केवळ एक फलंदाज म्हणून पाहिले जो आवश्यक असल्यास गोलंदाजी करू शकतो.
विश्वकपमध्ये 5 सामन्यात भारताने चार नंबरवर तीन फलंदाज खेळवले. यात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान विरुद्ध हार्दिक पांड्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात के. एल राहुलला संधी देण्यात आली होती. मात्र, शिखर धवन स्पर्धेला मुकल्यानं त्याला सलामीला उतरावं लागत आहे. त्यामुळे अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज विरुद्ध विजय शंकर चौथ्या क्रमांकावर उतरला. त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. विजयला विश्वकपमध्ये फक्त दोनदा चौथ्या क्रमांकावर फंलदाजी करण्याची संधी मिळाली आहे. या आधी अफगाणिस्तान विरुद्ध विजयने फक्त 29 धावा केल्या.