ICC Cricket World Cup 2019: वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडिया होणार सज्ज; या खेळाडूंना मिळू शकते संघात स्थान
आगामी वर्ल्ड कपसाठी जर 15 खेळाडूच्या संघाची घोषणा करण्यात आली तर, सलामीविर म्हणून भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) मैदानात उतरु शकतात. तर दुसऱ्या क्रमांकावर (Virat Kohli) आणि तीसऱ्या क्रमांकावर अंबाती रायडू (Ambati Rayudu) किंवा विजय शंकर (Vijay Shankar) फलंदाजीसाठी मैदानात उतरु शकतात.
Indian Squad for ICC Cricket World Cup 2019: आगामी आयसीसी वर्ल्ड कप (ICC Cricket World Cup) स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (Board of Control for Cricket in India) आज क्रिकेट संघाची घोषणा करणार आहे. ही घोषणा निवड समिती आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्या उपस्थितीत होईल. या वेळी वर्ल्ड कप स्पर्धा यजमानपद इंग्लंड देशाकडे आहे. या आधी इग्लंडमध्ये 1999 मध्ये वर्ल्ड कप झाला होता. त्या वेळी भारतीय संघ 'Super Six' स्टेज संघातूनच बाहेर फेकला गेला होता. त्यामुळे या वेळी भारतीय क्रिकेट संघाकडून क्रिकेटप्रेमींना विशेष आपेक्षा आहेत.
आगामी वर्ल्ड कपसाठी जर 15 खेळाडूच्या संघाची घोषणा करण्यात आली तर, सलामीविर म्हणून भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) मैदानात उतरु शकतात. तर दुसऱ्या क्रमांकावर (Virat Kohli) आणि तीसऱ्या क्रमांकावर अंबाती रायडू (Ambati Rayudu) किंवा विजय शंकर (Vijay Shankar) फलंदाजीसाठी मैदानात उतरु शकतात.
चौथ्या स्थानावर भारताचा माजी कर्णधार आणि आजच्या घडीचा सर्वात चपळ विकेटकीपर आणि फलंदाज महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) पाचव्या क्रमांकावर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) किंवा तरुण खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) फलंदाजीसाठी मैदानात उतरु शकतो. अष्ठपैलू खेळाडू अशी ओळख असलेला हार्दिक पंड्या (Hardik Pandya) हा सुद्धा भारतीय संघाचा घटक बनू शकतो. फिरकी गोलंदाज म्हणून युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal)आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, ICC Cricket World Cup 2019: भारताच्या संघाकडून विश्व चषक खेळण्यासाठी 15 खेळाडूंची नावे उद्या घोषित होण्याची शक्यता)
वेगवान गोलंदाजीबाबत बोलायचे तर ती जबाबदारी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) यांच्यावर सोपवली जाऊ शकते.
संघात स्थान मिळू शकणारे संभाव्य 15 खेळाडू
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, अंबाती रायडू, विजय शंकर, महेंद्र सिंह धोनी, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि खलील अहमद.
(The above story first appeared on LatestLY on Apr 15, 2019 11:37 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

