ICC World Cup 2019: एम एस धोनी या कारणामुळे सतत बदलत आहे विश्वचषकात बॅट, निवृत्तीशी निगडित आहे कारण

यावर बोलताना धोनीच्या व्यवस्थापकाने असे म्हटले की धोनी हे सर्व पैशांसाठी करीत नाही आहे.

(Photo Credits: Getty Images)

बुधवारी, एम. एस धोनी (MS Dhoni) च्या सेवानिवृत्तीबद्दल एक बातमी आली. सांगितले जात आहे विश्वकपच्या शेवटी धोनी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो. पीटीआयला बीसीसीआय (BCCI) च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "धोनी कधीही निवृत्ती जाहीर करू शकतो. त्यानं देशासाठी खुप केलं आहे. याआधी त्यानं कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता कारण त्याला फलंदाजीवर लक्षकेंद्रित करायचे होते. सध्या वर्ल्ड कपमध्ये त्याचा फॉर्म चांगला आहे त्यामुळं तो निवृत्ती जाहीर करू शकतो". आणि आता धोनीचे व्यवस्थापक अरुण पांडे (Arun Pandey)यांनी त्याच्या निवृत्तीचा इशारा दिला आहे. (एम एस धोनीच्या निवृत्तीनंतर या 3 खेळाडूंपैकी एक बनू शकतो टीम इंडिया चा विकेटकीपर)

विश्वचषक 2019 मध्ये धोनी विविध विविध ब्रँडच्या ब्रँड्ससह खेळत आहे. यावर बोलताना धोनीच्या व्यवस्थापकाने असे म्हटले की धोनी हे सर्व पैशांसाठी करीत नाही, तर आपल्या प्रयोजकांचे आभार मानण्यासाठी करत आहे ज्यांनी त्याला कठीण परिस्थितीत पाठिंबा दिला होता. पांडे यांच्या वक्तव्याने पक्की खात्री होत आहे की विश्वचषकानंतर धोनी क्रिकेटमधून निवृत्त होऊ शकतो.

यंदा, विश्वकपमध्ये आपल्या संथ केळीसाठी धोनीला बऱ्याचदा ट्रोल केले गेले होते. विशेषत: इंग्लंड (England) विरुद्ध भारत विजयी होणे अयशस्वी झाल्यानंतर यूजर्सने धोनीच्या फलंदाजीवर गंभीर प्रश्न उभे केले. वर्ल्ड कप 2019 मध्ये धोनीने अद्याप 223 धावा केल्या आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 चा टी-20 विश्वकप (T20 World Cup), 2011 आयसीसी विश्वकप आणि 2013 मध्ये आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफी (Champions Trophy) जिंकण्याची कामगिरी केली आहे.