T20 Cricket New Rule: ICC ने T-20 क्रिकेटमध्ये बदला नियम, धीमी ओव्हर टाकल्यास मोठी शिक्षा
आता दोन्ही देशांमधील टी-20 मालिकेदरम्यान प्रत्येक डावात पाणी आणि विश्रांतीसाठी ठराविक वेळ असेल. मात्र, हा ब्रेक घ्यायचा की नाही हे खेळाडूंवर अवलंबून असेल.
आयसीसीने (ICC) टी-20 क्रिकेटमध्ये (T-20 Cricket) धीमी ओव्हर (Slow Overs) टाकल्यास नवीन नियम (New Rules) लागू करुन दंड आकारण्यात येणार आहे. तसेच दिलेल्या वेळेत 20 षटके पूर्ण करू न शकणाऱ्या संघालाही दंड आकारण्यात येणार आहे. आयसीसीचा हा नवा नियम वेस्ट इंडिज (West Indies) आणि आयर्लंड (Ireland) यांच्यातील सबिना पार्कवर होणाऱ्या सामन्यापासून लागू होणार आहे. हा सामना 16 जानेवारीला होणार आहे. आयसीसीचा हा नवा नियम 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकातही लागू होईल. यासोबतच आयसीसीने टी-20 मालिकेतील प्रत्येक डावाच्या मध्ये ड्रिंक्स ब्रेकची तरतूद केली आहे. हा नियम महिला आणि पुरुष दोघांसाठी आणण्यात आला आहे. आता दोन्ही देशांमधील टी-20 मालिकेदरम्यान प्रत्येक डावात पाणी आणि विश्रांतीसाठी ठराविक वेळ असेल. मात्र, हा ब्रेक घ्यायचा की नाही हे खेळाडूंवर अवलंबून असेल.
काय असेल दंड
आयसीसीच्या नवीन नियमांनुसार, जर एखाद्या संघाने दिलेल्या वेळेत शेवटचे षटक सुरू केले नाही, तर त्या वेळेनंतर सर्व षटकांमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाला 30 यार्डांच्या परिघात अतिरिक्त क्षेत्ररक्षक ठेवावा लागेल. म्हणजे निर्धारित वेळेनंतर टाकलेल्या सर्व षटकांमध्ये केवळ चार क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळ असतील आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला अधिक धावा करण्याची संधी असेल. त्यामुळे शेवटचे षटक टाकणाऱ्या गोलंदाजांना अवघड जाईल आणि त्यांच्या चेंडूवर अधिक धावा होण्याची शक्यता निर्माण होईल. (हे ही वाचा IND vs SA: जोहान्सबर्गमध्ये टीम इंडियाच्या पराभवामुळे केएल राहुल नाराज, सांगितले पराभवाचे कारण)
नवीन नियमांनुसार, पहिला सामना वेस्ट इंडिज आणि आयर्लंडमध्ये
नवीन नियमांनुसार पुरुष क्रिकेटचा पहिला सामना वेस्ट इंडिज आणि आयर्लंड यांच्यात 16 जानेवारी रोजी सबिना पार्क मैदानावर खेळवला जाईल. त्याच वेळी, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा टी-20 सामना हा महिलांसाठीचा पहिला सामना असेल, ज्यामध्ये नवीन नियम लागू केले जातील. हा सामना 18 जानेवारीला होणार आहे.