IPL Auction 2025 Live

ICC Board Meet: 20 जुलै रोजी आयसीसीची बैठक, टी-20 वर्ल्ड कपबाबत औपचारिक घोषणेकडे BCCI चे डोळे

PTIच्या वृत्तानुसार, आयसीसी बोर्ड सोमवारी बैठक होणार असून या दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये यंदा आयोजित होणाऱ्या टी-20 विश्वचषकबाबत चर्चा केली जाईल.

आयसीसी टी -20 वर्ल्ड कप 2020 ट्रॉफी  (Photo Credits: Getty Images)

दोन महिन्यापासून टांगणीवर असलेले आयसीसी टी-20 वर्ल्ड कप (ICC T20 World Cup) स्पर्धेच्या आयोजनावर अंतिम निर्णय सोमवारी, 20 रोजी येण्याची अपेक्षा आहे. PTIच्या वृत्तानुसार, सोमवारी आयसीसीची बोर्ड बैठक (ICC Board Meeting) होणार असून या दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) यंदा आयोजित होणाऱ्या टी-20 विश्वचषकबाबत चर्चा केली जाईल. आयसीसीच्या या बैठकीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) लक्ष लागून असेल. टी-20 वर्ल्ड कप स्थगित झाल्यास बीसीसीआय या विंडो दरम्यान इंडियन प्रीमिअर लीगचे (IPL) आयोजन करण्याच्या प्रयत्नात आहे. 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत टी-20 विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे, परंतु व्हिक्टोरिया राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मे महिन्यातच या स्पर्धेचे आयोजन करण्यास असमर्थता दर्शविली होती. (IPL 2020 Update: 26 सप्टेंबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान होऊ शकते इंडियन प्रीमियर लीग 13चे आयोजन, सूत्रांची माहिती)

26,000 पेक्षा जास्त मृत्यूंसह भारतातील प्रकरणांची संख्या 10 लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे, आयपीएलचे आयोजन झाल्यास आणि केंद्र सरकारच्या ग्रीन सिग्नलनंतर आयपीएल युएईमध्ये आयोजित केले जाऊ शकते. “पहिली पायरी म्हणजे आशिया चषक स्थगित करणे, जे घडले. आयसीसीने स्थगितीची घोषणा केल्यानंतरच आम्ही आमच्या योजनांसह पुढे जाऊ शकू. क्रिकेट ऑस्ट्रेलिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यास फारसा उत्सुक नसल्याचे सांगितले नंतरही ते निर्णय देत नाहीत," बीसीसीआय अ‍ॅपेक्स कौन्सिलच्या सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर PTIला सांगितले.

भारत ऑस्ट्रेलियाबरोबर 2021 वर्ल्ड टी-20 आयोजनाचे हक्क बदलू इच्छित नसल्याने यंदाचा टी-20 वर्ल्ड कप 2022 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होईल असे म्हटले जात आहे. शिवाय, ऑस्ट्रेलियाने आपल्या खेळाडूंना सप्टेंबरच्या अखेरीस इंग्लंडविरुद्ध व्हाईट बॉल मालिकेसाठी तयारी  करण्यासाठी सांगितले आहे. त्या दौऱ्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 26-खेळाडूंच्या प्राथमिक पथकांची घोषणा देखील केली आहे. दुसरीकडे, आयसीसीने म्हटले की रद्द करण्याच्या निर्णयाची घोषणा करण्यापूर्वी त्यांना सर्व पर्यायांवर बारीक लक्ष द्यायचे आहे आणि त्यावर विचार करण्यासाठी अधिक वेळ घेणे चुकीचे नाही.