ICC ODI Team of The Year 2024: आयसीसीने 2024 चा सर्वोत्तम एकदिवसीय संघ केला जाहीर, कोण झाला कर्णधार घ्या जाणून

आयसीसीने श्रीलंकेच्या चारिथ अस्लंकाकडे संघाचे नेतृत्व सोपवले आहे. या संघात भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यासारख्या मोठ्या देशांतील कोणत्याही खेळाडूचा समावेश नाही. त्याच वेळी, श्रीलंकेच्या संघाचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते

Charith Aslanka (Photo Credit - X)

ICC ODI Team of The Year 2024: आयसीसीने 2024 साठी पुरुष एकदिवसीय संघ (ICC Mens ODI Team of the Year 2024) जाहीर केला आहे. या संघात अनेक देशांतील खेळाडूंनी स्थान मिळवले आहे, परंतु भारतीय चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे कारण टीम इंडियाचा (Team India) एकही खेळाडू त्यात समाविष्ट नाही. आयसीसीने श्रीलंकेच्या चारिथ अस्लंकाकडे (Charith Aslanka) संघाचे नेतृत्व सोपवले आहे. या संघात भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यासारख्या मोठ्या देशांतील कोणत्याही खेळाडूचा समावेश नाही. त्याच वेळी, श्रीलंकेच्या संघाचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते, कारण त्यांच्या 4 खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.

कोणत्या देशांतील खेळाडूंना संघात मिळाले स्थान मिळाले? (ICC ODI Team of The Year 2024)

श्रीलंका – 4 खेळाडू

पाकिस्तान – 4 खेळाडू

अफगाणिस्तान – 3 खेळाडू

वेस्ट इंडिज - 1 खेळाडू

हे देखील वाचा: IND vs ENG 2nd T20I 2025: चेन्नईत 7 वर्षांनी होणार टी-20 आंतरराष्ट्रीय सामना, कसा आहे तिथे टीम इंडियाचा रेकाॅर्ड? वाचा सविस्तर

भारतीय खेळाडूंना का मिळाली नाही संधी ?

गेल्या वर्षी, 6 भारतीय खेळाडूंना आयसीसीच्या वर्षातील एकदिवसीय संघात स्थान मिळाले. 2024 मध्ये, भारताने एकदिवसीय स्वरूपात फक्त 3 सामने खेळले, जे श्रीलंकेविरुद्ध होते. या तीन सामन्यांमध्ये भारताने 2 सामने गमावले आणि 1 सामना बरोबरीत सुटला. यामुळे, भारतीय खेळाडूंची कामगिरी प्रभावी नव्हती आणि त्यांना आयसीसीच्या या संघात स्थान गमवावे लागले.

आयसीसीने 2024 चा एकदिवसीय संघ

कर्णधार: चारिथ असलंका (श्रीलंका)

कुसल मेंडिस (श्रीलंका)

पथुम निस्सांका (श्रीलंका)

वानिंदू हसरंगा (श्रीलंका)

सॅम अयुब (पाकिस्तान)

शाहीन आफ्रिदी (पाकिस्तान)

हरिस रौफ (पाकिस्तान)

रहमानउल्लाह गुरबाज (अफगाणिस्तान)

अझमतुल्लाह ओमरझाई (अफगाणिस्तान)

गझनफर (अफगाणिस्तान)

शेरफेन रदरफोर्ड (वेस्ट इंडिज)

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now