RCB vs SRH IPL 2025 65th Match Live Scorecard: हैदराबादने बंगळुरूसमोर ठेवले 232 धावांचे लक्ष्य, इशान किशनची स्फोटक खेळी
आरसीबीने आधीच प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के केले आहे पण जर त्यांना टॉप 2 मध्ये राहायचे असेल तर या सामन्यात विजय आवश्यक आहे. हैदराबाद आता प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी, त्यांना सन्मानजनक विजयासह स्पर्धेतून बाहेर पडायचे आहे. दरम्यान, आरसीबीने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलदांजी करताना हैदराबादने बंगळुरुसमोर 232 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad, TATA IPL 2025 65th Match आयपीएल 2025 चा हा हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आजचा सामना टॉप 2चे चित्र बदलू शकतो. या हंगामातील 65 वा सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (SRH vs RCB) यांच्यात लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर खेळवला जात आहे. आरसीबीने आधीच प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के केले आहे पण जर त्यांना टॉप 2 मध्ये राहायचे असेल तर या सामन्यात विजय आवश्यक आहे. हैदराबाद आता प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी, त्यांना सन्मानजनक विजयासह स्पर्धेतून बाहेर पडायचे आहे. दरम्यान, आरसीबीने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलदांजी करताना हैदराबादने बंगळुरुसमोर 232 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
SRH's explosive batting display has powered them to a mammoth total! 🔥
Can RCB pull off this challenging chase? 🤔#IPL2025 #RCBvSRH #IshanKishan pic.twitter.com/MKgaaxFVPV
— Sportskeeda (@Sportskeeda) May 23, 2025
इशान किशनची स्फोटक खेळी
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबाद संघाची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी जलद 54 धावांची भागीदारी केली. सनरायझर्स हैदराबादने निर्धारित 20 षटकांत सहा गडी गमावून 231 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादकडून इशान किशनने नाबाद 94 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, इशान किशनने 48 चेंडूत सात चौकार आणि पाच षटकार मारले. इशान किशन व्यतिरिक्त अभिषेक शर्माने 34 धावा केल्या.
रोमारियो शेफर्डने घेतल्या सर्वाधिक दोन विकेट्स
दुसरीकडे, स्टार वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून रोमारियो शेफर्डने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. रोमारियो शेफर्डशिवाय लुंगी एनगिडी, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा आणि कृणाल पंड्याने प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 20 षटकांत 232 धावा कराव्या लागतील.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

