England vs Australia 5th ODI 2024 Live Streaming: आज इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 'अंतिम' सामना, विजेता संघ जिंकणार मालिका; जाणून घ्या कधी अन् कुठे घेणार सामन्याचा आनंद

चौथ्या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 186 धावांनी पराभव केला. तर तिसऱ्या सामन्यात 46 धावांनी पराभव पत्करावा लागला. या दोन विजयांसह यजमान संघाने मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली.

ENG vs AUS (Photo Credit - X)

England National Cricket Team vs Australia National Cricket Team 5th ODI 2024 Live Streaming: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ (Australia National Cricket Team) यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पाचवा सामना 29 सप्टेंबर रोजी ब्रिस्टल येथील काऊंटी मैदानावर होणार आहे. मालिकेतील पहिले दोन एकदिवसीय सामने गमावल्यानंतर इंग्लंडने जबरदस्त पुनरागमन केले. चौथ्या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 186 धावांनी पराभव केला. तर तिसऱ्या सामन्यात 46 धावांनी पराभव पत्करावा लागला. या दोन विजयांसह यजमान संघाने मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. दुसरीकडे तिसरा आणि चौथा सामना गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ बॅकफूटवर आहे. आता मालिकेतील शेवटचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा ठरणार असून विजयी संघ मालिकेवर कब्जा करेल.

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचवा वनडे सामना किती वाजता होणार सुरू?

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा आणि शेवटचा एकदिवसीय सामना 29 सप्टेंबर रोजी ब्रिस्टल येथील काऊंटी स्टेडियमवर खेळवला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 3.30 वाजता सुरू होईल. तर टॉसची वेळ अर्धा तास आधी असेल. (हे देखील वाचा: Team India Squad For Bangladesh T20 Series: चांगली कामगिरी करुनही BCCI कडून 5 खेळाडू दुर्लक्षित, टीम इंडियात स्थान मिळण्यास होते पात्र)

कुठे पाहणार सामना?

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा आणि शेवटचा एकदिवसीय सामना आपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहू शकता. हेच प्रसारण आपण सोनी स्पोर्ट्स टेन 5 एसडी/एचडी वरही पाहू शकता. तसेच सोनी लिव (SonyLiv) आणि फैनकोड ऐप और वेबसाइट यांवरही आपण या सामन्यांचा आनंद घेऊ शकता.

पाहा दोन्ही संघाचे खेळाडू

इंग्लंड एकदिवसीय संघ: हॅरी ब्रूक (कर्णधार), जोफ्रा आर्चर, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स (विकेट-कीपर), बेन डकेट, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, मॅथ्यू पॉट्स, आदिल रशीद, फिल सॉल्ट (विकेट-कीपर), जेमी स्मिथ (विकेट-कीपर), ऑली स्टोन, रीस टोपली, जॉन टर्नर

ऑस्ट्रेलिया एकदिवसीय संघ: मिचेल मार्श (कर्णधार), शॉन ॲबॉट, ॲलेक्स कॅरी (विकेट-कीपर), कूपर कोनोली, बेन द्वारशिस, कॅमेरॉन ग्रीन, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ॲरॉन हार्डी, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस (विकेट-कीपर), ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif