How to Download Hotstar & Watch SRH Vs MI Live Match: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे? इथे पाहा

शारजाह क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे.

सनरायझर्स हैदराबाद (Photo Credit: Twitter/IPL)

SRH Vs MI, 56th IPL Match 2020: आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 56व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स (Sunrisers Hyderabad Vs Mumbai Indians) आज एकमेकांशी भिडणार आहेत. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. सनरायझर्स हैदराबादच्या संघाचे नेतृत्व डेव्हिड वार्नर (David Warner) करत आहेत. तर, मुंबई इंडियन्सच्या संघाचे कर्णधार पद किरोन पोलार्ड (Kieron Pollard) संभाळत आहे. प्ले-ऑफच्या फेरीत प्रवेश करण्यासाठी हैदराबादच्या संघासाठी आजचा सामना महत्वाचा ठरणार आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली आयपीएलची स्पर्धा यावर्षी भारताऐवजी युएईमध्ये खेळवला जात आहे. जर तांत्रिक अडचणींनीमुळे तुम्ही टी.व्ही पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. डिस्नी+ हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+ हॉटस्टारवर सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगणारा आजचा सामनादेखील पाहता येणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल. हे देखील वाचा- SRH Vs MI, IPL 2020 Live Streaming: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर

सनरायझर्स हैदराबाद:

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), अभिषेक शर्मा, बेसिल थंपी, यरा पृथ्वीराज, बिली स्टॅनलेक, जॉनी बेयरस्टो (यष्टीरक्षक), केन विल्यमसन, मनीष पांडे, मोहम्मद नबी, राशिद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल , खलील अहमद, टी नटराजन, विजय शंकर, वृध्दिमान साहा, अब्दुल समद, फॅबियन अलन, जेसन होल्डर, प्रियम गर्ग, संदीप बावनका, संजय यादव, विराट सिंग.

मुंबई इंडियन्स:

रोहित शर्मा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक, किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिन्सन, सौरव तिवारी, धवल कुलकर्णी, आदित्य तरे, क्रिस लिन, मिशेल मॅकक्लेनाघन, नॅथन कूटर-नाईल, जयंत यादव, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, मोहसिन खान, शेरफेन रदरफोर्ड, दिग्विजय देशमुख, प्रिंस बलवंत राय.