How to Download Hotstar & Watch KXIP vs RR Live Match: किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे? इथे पाहा
किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स (Photo Credit: File Image)

KXIP vs RR 50th IPL Match 2020: इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premire League) 13 व्या सत्राचा 50व्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आमने-सामने येतील. पंजाब आणि राजस्थान यांच्यातील आजचा सामना अबू धाबी (Abu Dhabi) येथे खेळला जाईल. केएल राहुलच्या टीमच्या सुरूवातीच्या कामगिरीमध्ये चमत्कारीक बदल झाला असून त्यांनी सलग पाच सामने जिंकले आणि स्पर्धेत पुनरागमन केले. सध्या ते 12 सामन्यांत 12 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे, तर रॉयल्स 12 सामन्यांतून दहा गुणांसह सातव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्स वगळता उर्वरित सहा संघांसाठी मैदान खुले आहे, तर चेन्नई सुपर किंग्जचा संघ प्ले ऑफ शर्यतीतून बाहेर पडला आहे. जर आजच्या सामन्यात रॉयल्सचा पराभव झाला तर तेदेखील शर्यतीतून बाहेर पडतील, तर पंजाबचा रस्ता कठीण होऊ शकतो. पंजाबला त्यांचा कर्णधार केएल राहुल, तर राजस्थानला अष्टपैलू बेन स्टोक्सकडून प्रभावी खेळीची अपेक्षा असेल. (KXIP vs RR, IPL 2020 Live Streaming: किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली आयपीएलची स्पर्धा यावर्षी भारताऐवजी युएईमध्ये खेळवला जात आहे. जर तांत्रिक अडचणींनीमुळे तुम्ही टी.व्ही पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. डिस्नी+ हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+ हॉटस्टारवर किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगणारा आजचा सामनादेखील पाहता येणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल.

पाहा हॉटस्टार डाउनलोड करण्याच्या स्टेप्स:

1. प्रथम, आपल्या मोबाईमधील इंटरनेट सुरु करा आणि प्ले- स्टोर उघडून हॉटस्टार ऍप शोधा.

2. यानंतर इन्स्टॉल ऑप्शनवर जाऊन हॉटस्टार ऍप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करा.

3. इन्स्टॉल केल्यानंतर, आपल्या मोबाईलच्या मेनूमध्ये किंवा मुख्यपृष्ठावर हॉटस्टार अ‍ॅप चिन्ह दिसेल.

4. यानंतर आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटवरून साइन इन करून किंवा आवश्यक तपशील देऊन अ‍ॅप उघडू शकतात.

5. साइन इन होताच आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा टूर्नामेंट जसे की आयपीएल, टीव्ही मालिका, चित्रपट आणि बरेच काही हॉटस्टार वर पाहता येणार आहे.

हिंदी, इंग्रजी, बंगाली, तामिळ, पंजाबी अशा बर्‍याच भाषांमध्ये हॉटस्टार उपलब्ध आहे. टीव्ही मालिका, बातम्या, चित्रपट यासह हॉटस्टारवर 1 लाख तासांपर्यंतची व्हिडीओ कन्टेन्ट उपलब्ध आहे.