How to Download Hotstar & Watch MI Vs RCB Live Match: मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे? इथे पाहा
मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Photo Credit: File Image)

MI vs RCB 48th IPL Match 2020: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 स्पर्धेत काही नाट्यमय बदल पाहायाला मिळत आहेत. अव्वल तीन - मुंबई इंडियन्स (Mumbai Indians), रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि दिल्ली कॅपिटल - यांना अलीकडील सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले, पण एमआय (MI) आणि आरसीबी (RCB) पैकी एक आज रात्री जिंकून प्ले ऑफमधील त्यांचे स्थान मजबूत करेल. बेंगलोर आणि मुंबई यांच्यातील आयपीएलमधील (IPL) लढत चाहत्यांचे मनोरंजन करण्यात कधीच अपयशी ठरत नाही. मुंबई आणि आरसीबीचे 14 गुण आहेत, मात्र मुंबई इंडियन्स निव्वळ चांगल्या नेट रनरेटच्या आधारावर पहिल्या स्थानावर आहेत. दरम्यान, मुंबईचा मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून 8 विकेटने पराभव झाला तर आरसीबीला देखील चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 8 विकेटने पराभव पत्करावा लागला होता. मात्र, आजच्या सामन्यात जो संघ विजयी होईल तो प्ले ऑफमधील आपले स्थान सुरक्षित करेल आणि अंतिम-4 फेरी गाठणारा पहिला संघ बनेल. (MI vs RCB, IPL 2020 Live Streaming: मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली आयपीएलची स्पर्धा यावर्षी भारताऐवजी युएईमध्ये खेळवला जात आहे. जर तांत्रिक अडचणींनीमुळे तुम्ही टी.व्ही पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. डिस्नी+ हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+ हॉटस्टारवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात रंगणारा आजचा सामनादेखील पाहता येणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल.

पाहा हॉटस्टार डाउनलोड करण्याची पद्धत-

- प्रथम, आपल्या मोबाईमधील इंटरनेट सुरु करा आणि प्ले- स्टोर उघडून हॉटस्टार ऍप शोधा.

- यानंतर इन्स्टॉल ऑप्शनवर जाऊन हॉटस्टार ऍप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करा.

- इन्स्टॉल केल्यानंतर, आपल्या मोबाईलच्या मेनूमध्ये किंवा मुख्यपृष्ठावर हॉटस्टार अ‍ॅप चिन्ह दिसेल.

- यानंतर आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटवरून साइन इन करून किंवा आवश्यक तपशील देऊन अ‍ॅप उघडू शकतात.

- साइन इन होताच आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा टूर्नामेंट जसे की आयपीएल, टीव्ही मालिका, चित्रपट आणि बरेच काही हॉटस्टार वर पाहता येणार आहे.

हिंदी, इंग्रजी, बंगाली, तामिळ, पंजाबी अशा बर्‍याच भाषांमध्ये हॉटस्टार उपलब्ध आहे. टीव्ही मालिका, बातम्या, चित्रपट यासह हॉटस्टारवर 1 लाख तासांपर्यंतची व्हिडीओ कन्टेन्ट उपलब्ध आहे.