How to Download Hotstar & Watch RCB Vs KXIP Live Match: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे? इथे पाहा
विराट कोहली आणि केएल राहुल (Photo Credit: PTI)

RCB Vs KXIP IPL 2020 Live Match 31st: आयपीएलच्या (IPL) 13व्या सत्रात सलग पाच पराभवानंतर किंग्स इलेव्हन पंजाबसाठी (Kings XI Punjab) प्लेऑफचा रस्ता अवघड बनला आहे. लीगचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे आणि सर्व संघांना त्यांच्या कोट्यातील पुढील सात सामने खेळावे लागतील. पंजाब संघाला आता प्रत्येक सामना जिंकण्याची इच्छा असेल, तर विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) त्यांचा विजयरथ सुरू ठेवून पहिल्या चारमध्ये स्थान मिळवायच्या निर्धारित असतील. आरसीबी (RCB) संघ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि तिन्ही मागील दोन्ही सामने जिंकले आहेत. कर्णधार विराट कोहली, एबी डिव्हिलिअर्स, आरोन फिंच देवदत्त पडिक्कल असे आघाडीचे फलंदाजही मोठा डाव खेळत आहेत. दुसरीकडे, पंजाबने यंदाचा एकमेव विजय आरसीबीविरुद्ध मिळवला होता. त्यांची सलामी जोडी केएल राहुल आणि मयंक अग्रवालने आजवर उत्कृष्ट फलंदाजी केली, पण टीम त्यांच्याकडून मोठ्या सुरुवातीला आश्रित आहेत. शिवाय, मधल्या फळीत निकोलस पूरन फॉर्ममध्ये परतला असून त्याच्यावर मधली फळी सांभाळण्याची जबाबदारी असेल. (RCB vs KXIP, IPL 2020 Live Streaming: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)

कोरोना व्हायरसचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता क्रिकेट विश्वातील सर्वात लोकप्रिय टी-20 लीग आयपीएल यंदा भारताऐवजी युएईमध्ये खेळवली जात आहे. जर तांत्रिक अडणींनीमुळे तुम्हाला या लीगमधील सामने टीव्ही पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण डिस्नी+ हॉटस्टार अ‍ॅप वर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+ हॉटस्टारवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात रंगणारा आजचा सामना देखील पाहता येणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल.

हॉटस्टार डाउनलोड करण्याची पद्धत-

- प्रथम, आपल्या मोबाईमधील इंटरनेट सुरु करा आणि प्ले- स्टोर उघडून हॉटस्टार ऍप शोधा.

- यानंतर इन्स्टॉल ऑप्शनवर जाऊन हॉटस्टार ऍप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करा.

- इन्स्टॉल केल्यानंतर, आपल्या मोबाईलच्या मेनूमध्ये किंवा मुख्यपृष्ठावर हॉटस्टार अ‍ॅप चिन्ह दिसेल.

- यानंतर आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटवरून साइन इन करून किंवा आवश्यक तपशील देऊन अ‍ॅप उघडू शकतात.

- साइन इन होताच आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा टूर्नामेंट जसे की आयपीएल, टीव्ही मालिका, चित्रपट आणि बरेच काही हॉटस्टार वर पाहता येणार आहे.

हिंदी, इंग्रजी, बंगाली, तामिळ, पंजाबी अशा बर्‍याच भाषांमध्ये हॉटस्टार उपलब्ध आहे. टीव्ही मालिका, बातम्या, चित्रपट यासह हॉटस्टारवर 1 लाख तासांपर्यंतची व्हिडीओ कन्टेन्ट उपलब्ध आहे.