How to Download Hotstar & Watch RCB Vs KKR Live Match: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे? इथे पाहा

इंडियन प्रीमियर लीग 2020 च्या 28व्या हाय-व्होल्टेज सामन्यात आज विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा सामना दिनेश कार्तिकच्या कोलकाता नाईट रायडर्सशी होईल. आपण डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. हॉटस्टार अ‍ॅप डाउनलोड करून आपण आरसीबी आणि केकेआर यांच्यात रंगणारा आजचा सामनादेखील पाहता येणार आहे.

How to Download Hotstar & Watch RCB Vs KKR Live Match: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे? इथे पाहा
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: PTI)

RCB Vs KKR IPL 2020 Live Match:  इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 च्या 28व्या हाय-व्होल्टेज सामन्यात आज विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) सामना दिनेश कार्तिकच्या कोलकाता नाईट रायडर्सशी (Kolkata Knight Riders) होईल. आयपीएल (IPL) 2020 मध्ये दोन्ही संघांच्या कामगिरीबाबत बोलायचे तर दोन्ही संघांनी आजवर चांगली कामगिरी केली आहे. कोहलीच्या नेतृत्वाखालील बेंगलोर संघाने या मोसमात आतापर्यंत सहा सामन्यांपैकी चार सामने जिंकले आहेत, दुसरीकडे, दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात कोलकाता संघानेही त्यांच्या सहा पैकी चार सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर संघ सध्या चौथ्या स्थानी आहे, तर कोलकाता नाईट रायडर्स चांगली रन-रेटमुळे तिसर्‍या स्थानावर आहे. दोन्ही टीममधील आजच्या सामना मजेदार होण्याची शक्यता आहे कारण दोन्ही टीमकडे बॅटींग, बॉलिंग आणि फिल्डिंगचे चांगले मिश्रण आहे. पण काही विदेशी खेळाडूंचा फॉर्म दोन्ही संघांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. (RCB vs KKR, IPL 2020 Live Streaming: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली आयपीएल यंदा भारताऐवजी युएईमध्ये खेळवला जात आहे. जर तांत्रिक अडणींनीमुळे तुम्ही टी.व्ही पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. डिस्नी+ हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+ हॉटस्टारवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगणारा आजचा सामनादेखील पाहता येणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल.

हॉटस्टार डाउनलोड करण्याची पद्धत-

- प्रथम, आपल्या मोबाईमधील इंटरनेट सुरु करा आणि प्ले- स्टोर उघडून हॉटस्टार ऍप शोधा.

- यानंतर इन्स्टॉल ऑप्शनवर जाऊन हॉटस्टार ऍप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करा.

- इन्स्टॉल केल्यानंतर, आपल्या मोबाईलच्या मेनूमध्ये किंवा मुख्यपृष्ठावर हॉटस्टार अ‍ॅप चिन्ह दिसेल.

- यानंतर आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटवरून साइन इन करून किंवा आवश्यक तपशील देऊन अ‍ॅप उघडू शकतात.

- साइन इन होताच आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा टूर्नामेंट जसे की आयपीएल, टीव्ही मालिका, चित्रपट आणि बरेच काही हॉटस्टार वर पाहता येणार आहे.

हिंदी, इंग्रजी, बंगाली, तामिळ, पंजाबी अशा बर्‍याच भाषांमध्ये हॉटस्टार उपलब्ध आहे. टीव्ही मालिका, बातम्या, चित्रपट यासह हॉटस्टारवर 1 लाख तासांपर्यंतची व्हिडीओ कन्टेन्ट उपलब्ध आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 12, 2020 05:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).