How to Download Hotstar & Watch MI Vs DC Live Match: मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे? इथे पाहा
इंडियन प्रीमियर लीग 13च्या 27व्या हाय व्होल्टेज सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना आज संध्याकाळी विजयी रथावर स्वार दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. आपण डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. डिस्नी+ हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+ हॉटस्टारवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगणारा आजचा सामनादेखील पाहता येणार आहे.
MI vs DC 27th IPL Match 2020: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 13च्या 27व्या हाय व्होल्टेज सामन्यात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सामना आज संध्याकाळी विजयी रथावर स्वार दिल्ली कॅपिटल्सशी (Delhi Capitals) होणार आहे. आयपीएलमधील (IPL) दोन्ही संघांच्या कामगिरीबाबत बोलायचे तर रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाने या हंगामात सहा सामन्यातील केवळ दोन पराभव आणि चार विजय मिळवले आहेत. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने ने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात यंदा शानदार प्रदर्शन केले. दिल्लीचा संघ आयपीएल 2020 मध्ये सहा सामन्यांत एक पराभव आणि पाच विजयांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्ससमोर दिल्ली कॅपिटल्सचा विजयी रथ रोखण्याचे कठीण आव्हान असणार आहे. याशिवाय गतजेता मुंबई गुणतालिकेत दिल्लीचा पराभव करून गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवू पाहत असतील. (MI vs DC, IPL 2020 Live Streaming: मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली आयपीएल यंदा भारताऐवजी युएईमध्ये खेळवला जात आहे. जर तांत्रिक अडणींनीमुळे तुम्ही टी.व्ही पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. डिस्नी+ हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+ हॉटस्टारवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगणारा आजचा सामनादेखील पाहता येणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल.
हॉटस्टार डाउनलोड करण्याची पद्धत-
- प्रथम, आपल्या मोबाईमधील इंटरनेट सुरु करा आणि प्ले- स्टोर उघडून हॉटस्टार ऍप शोधा.
- यानंतर इन्स्टॉल ऑप्शनवर जाऊन हॉटस्टार ऍप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करा.
- इन्स्टॉल केल्यानंतर, आपल्या मोबाईलच्या मेनूमध्ये किंवा मुख्यपृष्ठावर हॉटस्टार अॅप चिन्ह दिसेल.
- यानंतर आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटवरून साइन इन करून किंवा आवश्यक तपशील देऊन अॅप उघडू शकतात.
- साइन इन होताच आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा टूर्नामेंट जसे की आयपीएल, टीव्ही मालिका, चित्रपट आणि बरेच काही हॉटस्टार वर पाहता येणार आहे.
हिंदी, इंग्रजी, बंगाली, तामिळ, पंजाबी अशा बर्याच भाषांमध्ये हॉटस्टार उपलब्ध आहे. टीव्ही मालिका, बातम्या, चित्रपट यासह हॉटस्टारवर 1 लाख तासांपर्यंतची व्हिडीओ कन्टेन्ट उपलब्ध आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 11, 2020 05:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

