How to Download Hotstar To Watch KXIP vs MI Live: किंग्स इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे? इथे पाहा
किंग्स इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्स (Photo Credit: File Image)

How to Download Hotstar To Watch KXIP vs MI Live: इंडियन प्रीमियर लीग 2020 च्या 13व्या सामन्यात मुंबई इंडियन्सची किंग्ज इलेव्हन पंजाबशी लढत होईल. यापूर्वी दोन्ही संघांना पराभव पत्करावा लागला आहे आणि रोहित शर्मा विरुद्ध केएल राहुलच्या या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून असले तरी मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब पुन्हा विजयी मार्गावर परतण्यासाठी उत्सुक असतील. आयपीएल 2020 मध्ये दोन्ही संघांच्या कामगिरीविषयी बोलायचे झाले तर दोन्ही टीमने तीन सामने खेळले आहेत ज्यात त्यांनी अनुक्रमे एक विजय आणि दोन सामने गमावले आहेत. आयपीएलच्या 13व्या सत्रात किंग्ज इलेव्हन पंजाबचे नेतृत्व युवा भारतीय फलंदाज केएल राहुल करत आहे, तर मुंबई इंडियन्सचे नेतृत्व टीम इंडियाचा मर्यादित ओव्हरचा उपकर्णधार रोहित शर्मा करीत आहेत. (KXIP vs MI, IPL 2020 Live Streaming: किंग्स इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)

कोरोना व्हायरसमुळे यंदा आयपीएलचा 13वा हंगाम भारताऐवजी युएईमध्ये खेळला जात आहे. जर आपणास काही कारणास्तव टीव्हीवर आयपीएलचा आनंद घेता येत नसेल तर आपण डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएलची मजा घेऊ शकता. डिस्नी+ हॉटस्टार यावर्षी आयपीएलचे स्ट्रीमिंग पार्टनर आहे. डिस्नी+ हॉटस्टारवर किंग्स इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आजचा सामना आपण पाहू शकता. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.

आपल्या मोबाइल फोनमध्ये हॉटस्टार डाउनलोड कसे करावे:

1. मोबाइलमध्ये हॉटस्टार डाउनलोड करणे खूप सोपे आहे. पहिले आपल्या मोबाइलच्या प्ले-स्टोअरवर जा आणि तेथे हॉटस्टार शोधा.

2. नंतर इन्स्टॉल ऑप्शनवर जा आणि आपल्या फोनमध्ये अ‍ॅप इन्स्टॉल करा.

3. इन्स्टॉल केल्यानंतर, आपल्या अ‍ॅप्स मेनूमध्ये किंवा मुख्यपृष्ठावर आपल्याला हॉटस्टार अ‍ॅप चिन्ह दिसेल.

4. यानंतर आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटवरून साइन इन करून किंवा आवश्यक तपशील देऊन अ‍ॅप उघडू शकता.

5. साइन इन होताच आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा टूर्नामेंट जसे की आयपीएल, टीव्ही मालिका, चित्रपट आणि बरेच काही हॉटस्टार वर पाहू शकता.

हिंदी, इंग्रजी, बंगाली, तामिळ, पंजाबी अशा बर्‍याच भाषांमध्ये हॉटस्टार उपलब्ध आहे. टीव्ही मालिका, बातम्या, चित्रपट यासह हॉटस्टारवर 1 लाख तासांपर्यंतची व्हिडीओ कन्टेन्ट उपलब्ध आहे.