How to Download Hotstar To Watch RR vs KKR Live: राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे? इथे पाहा

जर आपणस काही कारणास्तव टीव्हीवर आयपीएलचा आनंद घेता येत नसेल तर आपण डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएल लाइव्ह पाहू शकता. डिस्नी+ हॉटस्टारवर राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आजचा सामना आपण पाहू शकता. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Photo Credits: File Photo)

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात आज इंडियन प्रीमिअर लीगमधील (Indian Premeir League) 12 वा सामना खेळला जाईल. यंदा आयपीएलचे दोन्ही सामने जिंकलेल्या राजस्थानने पॉईंट टेबलवर दुसर्‍या स्थानावर आहे. दुसरीकडे कोलकाता एक विजय आणि एका पराभवासह सहाव्या स्थानावर आहे. दोन उच्च-स्कोअरिंग सामने खेळलेल्या रॉयल्सचा पहिला सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Stadiym) होणार आहे. तसेच नाईट रायडर्स देखील पहिले दोन सामने अबू धाबी येथे खेळले आणि पहिल्यांदा दुबई येथे खेळतील. दोन्ही टीममध्ये आजवर एकूण 21 सामने खेळले गेले आहेत. यापैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी 10 समाने जिंकले. युएई येथे दोन्ही 2014मध्ये टीम एकदा आमने-सामने आले आहेत आणि त्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने बाजी मारली. मात्र आजच्या सामन्यात कोण-कोणावर भारी पडेल हे पाहणे औत्सुकतेचे ठरेल. (IPL 2020: KKRविरुद्ध आयपीएल सामन्यासाठी राजस्थान रॉयल्स सज्ज, 'डॉन' स्टाईलमध्ये दिली चेतावणी Watch Video)

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा आयपीएलचा 13 वा हंगाम भारताऐवजी युएईमध्ये खेळवला जात आहे, पण जर आपणस काही कारणास्तव टीव्हीवर आयपीएलचा आनंद घेता येत नसेल तर आपण डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएल लाइव्ह पाहू शकता. डिस्नी+ हॉटस्टारवर राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आजचा सामना आपण पाहू शकता. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.

आपल्या मोबाइल फोनमध्ये हॉटस्टार डाउनलोड कसे करावे:

1. मोबाइलमध्ये हॉटस्टार डाउनलोड करणे खूप सोपे आहे. पहिले आपल्या मोबाइलच्या प्ले-स्टोअरवर जा आणि तेथे हॉटस्टार शोधा.

2. नंतर इन्स्टॉल ऑप्शनवर जा आणि आपल्या फोनमध्ये अ‍ॅप इन्स्टॉल करा.

3. इन्स्टॉल केल्यानंतर, आपल्या अ‍ॅप्स मेनूमध्ये किंवा मुख्यपृष्ठावर आपल्याला हॉटस्टार अ‍ॅप चिन्ह दिसेल.

4. यानंतर आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटवरून साइन इन करून किंवा आवश्यक तपशील देऊन अ‍ॅप उघडू शकता.

5. साइन इन होताच आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा टूर्नामेंट जसे की आयपीएल, टीव्ही मालिका, चित्रपट आणि बरेच काही हॉटस्टार वर पाहू शकता.

हिंदी, इंग्रजी, बंगाली, तामिळ, पंजाबी अशा बर्‍याच भाषांमध्ये हॉटस्टार उपलब्ध आहे. टीव्ही मालिका, बातम्या, चित्रपट यासह हॉटस्टारवर 1 लाख तासांपर्यंतची व्हिडीओ कन्टेन्ट उपलब्ध आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif