How to Download Hotstar & Watch SRH vs RCB, Eliminator Match Live: रॉयल चैलेंजर्स बंगलोर आणि सनराइजर्स हैदराबाद यांच्यातील लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे?
जर तांत्रिक अडचणींनीमुळे तुम्ही टीव्ही पाहता येत नसेल तर, आपण डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. डिस्नी+ हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे.
SRH vs RCB, IPL 2020 Eliminator Match: इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 2020 चा एलिमिनेटर सामना आज विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि डेविड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात अबू धाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. आजच्या स्पर्धेतील विजेत्या टीम 8 नोव्हेंबर रोजी क्वालिफायर -2 (दिल्ली कॅप्टल्स) च्या सामन्यात अबू धाबी येथे खेळले, तर पराभूत होणार संघ लीगमधून बाहेर पडेल. विराट कोहलीच्या आरसीबीला (RCB) मागील सामन्यात पराभव पत्करावा लागला होता, तर वॉर्नरच्या हैदराबादचे विजयाची हॅटट्रिक करत प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले आहेत. आरसीबीचा मागील सलग चार सामन्यात पराभव झाल्याने आजच्या सामन्यात ते प्रभावी खेळ करून फायनलच्या दिशेने पाऊल उचलतील. दुसरीकडे, हैदराबाद आपला विजयी फॉर्म कायम ठेवू पाहत असेल. (SRH vs RCB, Eliminator Live Streaming: सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील आयपीएल एलिमिनेटर लाईव्ह सामना व स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली आयपीएलची स्पर्धा यावर्षी भारताऐवजी युएईमध्ये खेळवला जात आहे. जर तांत्रिक अडचणींनीमुळे तुम्ही टीव्ही पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. डिस्नी+ हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+ हॉटस्टारवर रॉयल चैलेंजर्स बंगलोर आणि सनराइजर्स हैदराबाद यांच्यात रंगणारा आजचा सामनादेखील पाहता येणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल.पाहा हॉटस्टार डाउनलोड करण्याच्या स्टेप्स:
1. प्रथम, आपल्या मोबाईमधील इंटरनेट सुरु करा आणि प्ले- स्टोर उघडून हॉटस्टार ऍप शोधा.
2. यानंतर इन्स्टॉल ऑप्शनवर जाऊन हॉटस्टार ऍप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करा.
3. इन्स्टॉल केल्यानंतर, आपल्या मोबाईलच्या मेनूमध्ये किंवा मुख्यपृष्ठावर हॉटस्टार अॅप चिन्ह दिसेल.
4. यानंतर आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटवरून साइन इन करून किंवा आवश्यक तपशील देऊन अॅप उघडू शकतात.
5. साइन इन होताच आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा टूर्नामेंट जसे की आयपीएल, टीव्ही मालिका, चित्रपट आणि बरेच काही हॉटस्टार वर पाहता येणार आहे.
हिंदी, इंग्रजी, बंगाली, तामिळ, पंजाबी अशा बर्याच भाषांमध्ये हॉटस्टार उपलब्ध आहे. टीव्ही मालिका, बातम्या, चित्रपट यासह हॉटस्टारवर 1 लाख तासांपर्यंतची व्हिडीओ कन्टेन्ट उपलब्ध आहे.