How to Download Hotstar & Watch SRH vs RR Live Match: सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे? इथे पाहा
सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स (Photo Credit: File Image)

SRH vs RR IPL 2020 Live Match: आयपीएलच्या (IPL0 13 व्या सत्रात आज चौथा डबल हेडर खेळला जाईल. पहिला सामना दुपारी 3.30 वाजता दुबईमध्ये सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) ) यांच्यात होईल. यानंतर अबू धाबी येथे पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटलमध्ये दरम्यान सायंकाळी 7.30 लढत पाहायाला मिळेल. डेविड वॉर्नरच्या (David Warner) नेतृत्वात हैदराबादने या मोसमात खेळलेल्या 6 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला असून संघ पॉइंट्स टेबलमध्ये 6 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, राजस्थानने स्पर्धेत चांगली सुरुवात केली होती, पण सलग 4 सामने गमावल्यानंतर ते 7 व्या स्थानावर आहेत. अशा परिस्थितीत हैदराबादविरुद्ध स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांच्यासमोर विजय मिळवण्याचे आव्हान असेल. राजस्थानसाठी आजच्या सामन्यात त्यांचा धडाकेबाज अष्टपैली बेन स्टोक्स आजच्या सामन्यात झळकण्याची शक्यता आहे. (SRH vs RR, IPL 2020 Live Streaming: सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतातील सर्वात लोकप्रिय आयपीएल, यंदा युएईमध्ये आयोजित करण्यात आली आहे. जर तांत्रिक अडणींनीमुळे तुम्हीला टीव्हीवर आयपीएलचे सामने पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण हॉटस्टार अ‍ॅपवर आयपीएल लाईव्ह पाहू शकता. हॉटस्टार यंदा आयपीएलचे स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+हॉटस्टारवर सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगणारा आजचा सामनादेखील पाहता येणार आहे. हा सामना दुपारी 3.30 वाजेपासून लाईव्ह प्रसारित केला जाईल. हॉटस्टार डाउनलोड करण्याच्या सोप्प्या स्टेप्स-

- प्रथम, आपल्या मोबाईमधील इंटरनेट सुरु करा आणि प्ले- स्टोर उघडून हॉटस्टार ऍप शोधा.

- यानंतर इन्स्टॉल ऑप्शनवर जाऊन हॉटस्टार ऍप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करा.

- इन्स्टॉल केल्यानंतर, आपल्या मोबाईलच्या मेनूमध्ये किंवा मुख्यपृष्ठावर हॉटस्टार अ‍ॅप चिन्ह दिसेल.

- यानंतर आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटवरून साइन इन करून किंवा आवश्यक तपशील देऊन अ‍ॅप उघडू शकतात.

- साइन इन होताच आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा टूर्नामेंट जसे की आयपीएल, टीव्ही मालिका, चित्रपट आणि बरेच काही हॉटस्टार वर पाहता येणार आहे.

हिंदी, इंग्रजी, बंगाली, तामिळ, पंजाबी अशा बर्‍याच भाषांमध्ये हॉटस्टार उपलब्ध आहे. टीव्ही मालिका, बातम्या, चित्रपट यासह हॉटस्टारवर 1 लाख तासांपर्यंतची व्हिडीओ कन्टेन्ट उपलब्ध आहे.