IPL Auction 2025 Live

Why is Shikhar Dhawan called Gabbar: शिखर धवनला 'गब्बर' हे नाव कसे पडलं, जाणून घ्या टोपणनावाची संपूर्ण गोष्ट

शिखर धवनच्या 'गब्बर' नावामागील कथाही खूप रंजक आहे. शिखर धवनने एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता.

Shikhar Dhawan (Photo Credit - X)

Shikhar Dhawan Retirement: भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने (Shikhar Dhawan) आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती (Shikhar Dhawan Retirement) जाहीर केली आहे. शनिवारी सकाळी त्यांने सोशल मीडियावर ही घोषणा केली. शिखर धवनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी केला आणि सांगितले की, गोष्टीत पुढे जाण्यासाठी पाने उलटणे आवश्यक आहे आणि मी देखील तेच करणार आहे. मी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. शिखर धवनला भारतीय क्रिकेट संघाचा 'गब्बर' असेही म्हटले जाते. शिखर धवनच्या 'गब्बर' नावामागील कथाही खूप रंजक आहे. शिखर धवनने एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता.

हे देखील वाचा: Why is Shikhar Dhawan called Gabbar: शिखर धवनला 'गब्बर' हे नाव कसे पडलं, जाणून घ्या टोपणनावाची संपूर्ण गोष्ट

शिखर धवनला 'गब्बर' का म्हणतात?

त्याला 'गब्बर' का म्हणतात याचा खुलासा खुद्द शिखर धवनने एका मुलाखतीत केला होता. स्पोर्ट्सटकला दिलेल्या मुलाखतीत शिखर धवन म्हणाला होता, "मी रणजी ट्रॉफीमध्ये खेळत होतो आणि सिली पॉईंटवर उभा होतो. जेव्हा दुसऱ्या संघात मोठी भागीदारी होते तेव्हा सर्व खेळाडू निराश होत. अशा परिस्थितीत 'बहुत याराना है सुअर के बच्चों' असं मी ओरडले आणि सगळे जोरजोरात हसायला लागले. आमच्या प्रशिक्षकाने (विजय) तिथून माझे नाव 'गब्बर' ठेवले. तिथून हे नाव इतकं प्रसिद्ध झालं की जगभरातील क्रिकेट चाहते आता मला 'गब्बर' म्हणतात.

शिखर धवनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

38 वर्षीय शिखर धवनने भारतासाठी 34 कसोटी, 167 एकदिवसीय आणि 68 टी-20 सामने खेळले आहेत. 34 कसोटीत त्याने 40.61 च्या सरासरीने आणि सात शतकांसह 2315 धावा केल्या. त्याने 167 एकदिवसीय सामन्यांमध्ये 17 शतके झळकावली. शिखर धवनच्या वनडेमध्ये 44.11 च्या सरासरीने 6793 धावा आहेत. धवनने भारतासाठी 68 टी-20 सामन्यांमध्ये 11 अर्धशतकांसह 1759 धावा केल्या.