IND vs PAK T20 World Cup: भारत आणि पाकिस्तानच्या हाय व्होल्टेज मॅचच्या तिकिटाची किती आहे किंमत? जाणून घ्या कधी, कुठे आणि कसे करणार बुक
न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर हे दोन्ही संघ भिडतील. टीम इंडिया आणि पाकिस्तानच्या सामन्यांच्या तिकिटांची विक्री फार पूर्वीपासून सुरू झाली होती. चाहते ते ऑनलाइन बुक करू शकतात.
T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकाला (T20 World Cup 2024) सुरुवात झाली आहे. हा विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्यातर्फे खेळले जात आहे. भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाने (Indian National Cricket Team) 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात शानदार पद्धतीने केली. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात आयर्लंड क्रिकेट संघाचा (Ireland Natioanl Cricket Team) 8 विकेटने पराभव केला. टीम इंडियाच्या गोलंदाजांशिवाय फलंदाजांनीही आयर्लंडविरुद्ध आपले कौशल्य दाखवले. मात्र, आता जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा भारत-पाकिस्तान सामन्यावर लागल्या आहेत. टीम इंडिया आणि पाकिस्तान शनिवारी म्हणजेच 9 जून रोजी आमनेसामने येणार आहेत. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर हे दोन्ही संघ भिडतील. टीम इंडिया आणि पाकिस्तानच्या सामन्यांच्या तिकिटांची विक्री फार पूर्वीपासून सुरू झाली होती. चाहते ते ऑनलाइन बुक करू शकतात.
टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे तिकीट आयसीसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन बुक केले जाऊ शकते. आयसीसी टी-20 वर्ल्ड कप वेबसाइटला भेट दिल्यानंतर, तुम्हाला खरेदी तिकीट वर क्लिक करावे लागेल. यानंतर टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील मॅचची निवड करावी लागेल. (हे देखील वाचा: IND vs PAK T20 World Cup: पाकिस्तानसाठी 'हे' तीन भारतीय खेळाडू ठरू शकतात धोकादायक, एकतर्फी जिंकवू शकतात सामना)
सध्या येथे दोन किमतीच्या श्रेणीतील तिकिटे उपलब्ध आहेत. प्रीमियम क्लब तिकिटाची किंमत 2500 डॉलर आहे, याचा अर्थ तुम्हाला 2 लाख रुपयांपेक्षा थोडे जास्त द्यावे लागेल. दुसरे तिकीट डायमंड क्लबचे आहे. हे प्रीमियम क्लबपेक्षा अधिक महाग आहे. या विभागातील तिकिटाची किंमत 10 हजार डॉलर्स आहे. त्याची किंमत सुमारे 8 लाख 34 हजार रुपये असेल.
तिकीट बुकिंगची संपूर्ण पद्धत येथे आहे
प्रथम आयसीसी वेबसाइटवर जा
तिकीट विभागासाठी येथे क्लिक करा
टीम इंडिया आणि पाकिस्तान मॅच निवडा
यानंतर आसन आणि विभाग निवडा
पेमेंट केल्यानंतर तिकीट PDF मध्ये सेव्ह करा.
टीम इंडियाने 8 गडी राखून मिळवला पहिला विजय
टीम इंडियाने या स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे. टीम इंडियाने पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळला. या सामन्यात टीम इंडियाने 8 गडी राखून विजय मिळवला. टीम इंडियाचा दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध आहे. यानंतर टीम इंडिया अमेरिका आणि कॅनडाविरुद्ध मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे पाकिस्तानने पहिला सामना अमेरिकेविरुद्ध खेळला. या सामन्यात पाकिस्तान संघाला सुपर ओव्हरमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले.