ICC Women’s T20 World Cup मध्ये IND vs PAK चा कसा आहे विक्रम? आतापर्यंत कोण कोणावर ठरलंय वरचढ?

टी-20 इंटरनॅशनलमध्ये दोन्ही संघांचे हेड-टू-हेड रेकॉर्ड कसे आहेत, तसेच आयसीसी महिला विश्वचषक टी-20 वर्ल्ड कपमध्ये कोणत्या संघाने वर्चस्व राखले आहे ते पाहूया.

IND W vs PAK W (Photo Credit - X)

IND W vs PAK W T20I Head to Head: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाची (Team India) आयसीसी महिला टी-20 विश्वचषकात (ICC Women’s T20 World Cup 2024) चांगली सुरुवात झाली नाही. पहिल्याच सामन्यात न्यूझीलंड संघाकडून 58 धावांनी पराभव स्वीकाराव (NZ Beat IND) लागला. या संघाच्या नजरा आता कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याकडे लागल्या (IND vs PAK) आहेत. या दोन्ही संघांमधील हा सामना रविवार 6 ऑक्टोबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium, Dubai) होणार आहे. टी-20 इंटरनॅशनलमध्ये दोन्ही संघांचे हेड-टू-हेड रेकॉर्ड कसे आहेत, तसेच आयसीसी महिला विश्वचषक टी-20 वर्ल्ड कपमध्ये कोणत्या संघाने वर्चस्व राखले आहे ते पाहूया.

टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दोन्ही संघांचा कसा आहे विक्रम?

टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. दोन्ही संघ 15 वेळा आमनेसामने आले आहेत, त्यापैकी भारतीय महिला संघाने 12 वेळा पाकिस्तानला पराभूत केले आहे, तर पाकिस्तानने केवळ तीन वेळा विजय मिळवला आहे. टी-20 विश्वचषकात दोन्ही संघांमध्ये सहा सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी चार सामने भारताने जिंकले आहेत तर दोन पाकिस्तानने जिंकले आहेत.

हे देखील वाचा: IND vs NZ Amelia Kerr Run Out Controversy: टीम इंडियासोबत झाली चीटिंग? फलंदाज बाद होऊनही पॅव्हेलियनमध्ये गेला नाही; वाचा नेमक काय घडल

टी-20 विश्वचषकासाठी भारतीय महिला संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष (यष्टीरक्षक), पूजा वस्त्राकर, अरुंधती, रेड्डी, रेणुका सिंग, डी हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, सजीवन सजना.

टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा महिला संघ

फातिमा सना (कर्णधार), मुनिबा अली (यष्टीरक्षक), गुल फिरोज, सिद्रा अमीन, निदा दार, आलिया रियाझ, तुबा हसन, सदफ शमास, नशरा संधू, डायना बेग, सादिया इक्बाल, इरम जावेद, ओमामा सोहेल, सय्यदा अरुब शाह, तस्मिया रुबाब.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif