IND vs AUS 1st Test Head to Head: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाची कसोटीत कशी आहे आकडेवारी? कोणाचे आहे वर्चस्व? जाणून घ्या हेड टू हेड रेकाॅर्ड
त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची धुरा पीट कमिन्सच्या हाती आहे.
Australia National Cricket Team vs India National Cricket Team: भारत-ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy 2024-25) शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे होणाऱ्या मालिकेतील पहिल्या कसोटीला सुरुवात होण्यास काही तास उरले आहेत. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पहिल्या कसोटीत कार्यवाहक कर्णधार म्हणून टीम इंडियाची (Team India) जबाबदारी घेत आहे, कारण नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे भारतात आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची धुरा पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) हाती आहे. ट्रॉफीसोबत दोन्ही कर्णधारांचे फोटोशूटही करण्यात आले आहे. फक्त सामना सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. या मालिकेबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटीतील विक्रम (1947-2023) (IND vs AUS Test Head to Head)
एकूण कसोटी सामने: 107
ऑस्ट्रेलिचा विजय: 45
भारताचा पराभव: 32
ड्रॉ- 29
टाय-1
ऑस्ट्रेलियात भारताची कामगिरी अत्यंत खराब
ऑस्ट्रेलियन भूमीवर भारतीय संघाचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. भारताने यजमान संघाविरुद्ध ऑस्ट्रेलियात 52 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये भारतीय संघ केवळ 9 वेळा जिंकू शकला आहे तर टीम इंडियाला 45 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. या कालावधीत 1 सामना टाय झाला आणि 29 कसोटी अनिर्णित राहिल्या. (हे देखील वाचा: IND vs AUS 1st Test Playing 11: कोण आत कोण बाहेर... पहिल्या कसोटीत कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग-11? कर्णधार बुमराहचा खुलासा)
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT) मध्ये सर्वाधिक धावा
सचिन तेंडुलकर - 65 डावात 3262 धावा
रिकी पाँटिंग – 51 डावात 2555 धावा
व्हीएस लक्ष्मण - 54 डावात 2434 धावा
राहुल द्रविड - 60 डावात 2143 धावा
मायकल क्लार्क - 40 डावात 2049 धावा
चेतेश्वर पुजारा - 43 डावात 2033 धावा
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT) मध्ये सर्वाधिक विकेट
नॅथन लायन - 47 डावात 116 विकेट्स
रविचंद्रन अश्विन – 42 डावात 114 विकेट्स
अनिल कुंबळे - 38 डावात 111 विकेट्स
हरभजन सिंग – 35 डावात 95 विकेट्स
रवींद्र जडेजा - 30 डावात 85 विकेट्स
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT) मध्ये सर्वाधिक शतके
सचिन तेंडुलकर - 65 डावात 9 शतके
स्टीव्ह स्मिथ - 35 डावात 8 शतके
विराट कोहली - 42 डावात 8 शतके
रिकी पाँटिंग – 51 डावात 8 शतके
मायकेल क्लार्क - 40 डावात 7 शतके
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT) मध्ये सर्वाधिक पाच बळी घेणारे गोलंदाज
अनिल कुंबळे - 38 डावात 10
नॅथन लियॉन - 47 डावात 9
हरभजन सिंग – 35 डावात 7
रविचंद्रन अश्विन – 42 डावात 7
रवींद्र जडेजा – 30 डावात 5