PBKS vs GT, IPL 2024 37th Match Stats And Record Preview: पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्समध्ये होणार हाय व्होल्टेज सामना, आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' मोठे विक्रम
पंजाबने 7 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत, तर 5 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. ते 4 गुणांसह गुणतालिकेत 9व्या क्रमांकावर आहेत. अशा स्थितीत त्यांना विजयाचे वेध लागणार आहेत. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने 7 पैकी 3 सामने जिंकले आहेत आणि 5 सामने गमावले आहेत.
PBKS vs GT: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 37 वा (IPL 2024) सामना पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स (PBKS vs GT) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल. पंजाब किंग्जला मागील तीन सामन्यांत सलग पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाबने 7 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत, तर 5 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. ते 4 गुणांसह गुणतालिकेत 9व्या क्रमांकावर आहेत. अशा स्थितीत त्यांना विजयाचे वेध लागणार आहेत. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने 7 पैकी 3 सामने जिंकले आहेत आणि 5 सामने गमावले आहेत. शुभमन गिलचा संघ 6 गुणांसह गुणतालिकेत 8व्या स्थानावर आहे. (हे देखील वाचा: PBKS vs GT Head to Head: चुरशीच्या लढतीत पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स आमनेसामने, जाणून घ्या दोन्ही संघांची हेड टू हेड आकडेवारी)
आजच्या सामन्यात होऊ शकतात हे मोठे विक्रम
पंजाब किंग्जचा अनुभवी गोलंदाज हर्षल पटेल इंडियन प्रीमियर लीगमध्ये 100 वा आयपीएल सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
पंजाब किंग्जचा स्फोटक फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनला इंडियन प्रीमियर लीगमध्ये 1000 धावा पूर्ण करण्यासाठी 67 धावांची गरज आहे.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्सचा घातक फलंदाज डेव्हिड मिलरला 200 चौकारांचा टप्पा गाठण्यासाठी पाच चौकारांची गरज आहे.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुजरात टायटन्सचा पंजाब किंग्जचा घातक अष्टपैलू खेळाडू राहुल तेवतियाला 1000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी 62 धावांची गरज आहे.
पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनला इंडियन प्रीमियर लीगमध्ये 100 झेल पूर्ण करण्यासाठी आणखी एका झेलची गरज आहे.
टी-20 क्रिकेटमध्ये पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्सचा घातक फलंदाज मॅथ्यू वेडला 450 चौकारांचा टप्पा गाठण्यासाठी आणखी नऊ चौकारांची गरज आहे.
टी-20 क्रिकेटमध्ये पंजाब किंग्जचा गुजरात टायटन्सचा स्टार गोलंदाज जोशुआ लिटलला 150 बळींचा टप्पा गाठण्यासाठी पाच विकेट्सची गरज आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 21, 2024 06:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

