Fantasy Leagues Apps: फॅन्टेसी लीग अ‍ॅप संदर्भात सौरव गांगुली, विराट कोहली यांना मद्रास उच्च न्यायालयाकडून नोटीस

फॅन्टेसी लीग अॅपची (Fantasy Leagues Apps) जाहिरात करणाऱ्या बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्यासह भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांना मद्रास उच्च न्यायालयाने (Madras High Court) कायदेशीर नोटीस बजावली आहे.

विराट कोहली, सौरव गांगुली (Photo Credit: Getty)

फॅन्टेसी लीग अॅपची (Fantasy Leagues Apps) जाहिरात करणाऱ्या बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्यासह भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांना मद्रास उच्च न्यायालयाने (Madras High Court) कायदेशीर नोटीस बजावली आहे. तामिळनाडूमधील अनेक तरुणांनी गेल्या काही दिवसांत या अ‍ॅप्सद्वारे पैसे गमावल्यानंतर आत्महत्या केली आहे. मोहम्मद रिझवी यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने फॅन्टेसी लीग अॅप आणि त्यांची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटीजला कडक शब्दांत जाब विचारला आहे. यात दक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj), तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia), राणा डग्गुबती (Rana Daggubati) यांच्याही समावेश आहे. फॅन्टेसी लीगच्या जाहीरातीबाबत या सर्वांना 19 नोव्हेंबरपर्यंत जबाब नोदवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आयपीएलचा तेरावा हंगामा सुरू झाल्यापासून क्रिकेट आणि अन्य काही खेळांशी संबंधित फॅन्टेसी लीग अॅप भलतेच लोकप्रिय होऊ लागले आहेत. त्यापैकी ड्रीम इलेव्हन हे तर, आयपीएलचे स्पॉन्सरच झाले आहे. अशा अॅप्सच्या विश्वासार्हतेवर न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यापैकी काही अॅप चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल यांच्यासह विविध राज्यांच्या नावाने तयार करण्यात आली आहेत. या टीम त्या त्या राज्यांच्या बाजूने खेळतात का?’ असा सवाल न्यायमूर्ती एन. किरूबकारण आणि न्यायमूर्ती बी. पुगालेन्धी यांच्या खंडपीठाने विचारला आहे. हे देखील वाचा- PSL 2020 PlayOffs Squad: पाकिस्तान सुपर लीग 2020 प्लेऑफ सामन्यांसाठी संघांची घोषणा, फाफ डु प्लेसिस Peshawar Zalmi साठी करणार डेब्यू

याआधीही कोहलीवर ऑगस्ट 2020 मध्ये असेच एक प्रकरण दाखल झाले होते. ते प्रकरण चेन्नई येथील वकिलाने केले होते. ऑनलाईन जुगार खेळण्यावर बंदी घालावी, अशी त्यांची मागणी होती. या अ‍ॅप्सची जाहिरात करणार्‍या तार्‍यांना अटक करण्याची मागणीही त्यांनी केली. वकील म्हणाले की, जुगाराचे व्यसन हेसमाजासाठी अत्यंत धोकादायक आहे. तसेच घटनेच्या अनुच्छेद 21 नुसार जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन करते