IPL Auction 2025 Live

Afghanistan vs Bangladesh ODI Stats: वनडे सामन्यात अफगाणिस्तान आणि बांगलादेशची एकमेकांविरुद्ध 'अशी' आहे कामगिरी, येथे वाचा येथे हेड टू हेड आकडेवारीसह संपूर्ण तपशील

हे सर्व सामने सायंकाळी 5 वाजल्यापासून खेळवले जातील. वनडे फॉरमॅटमध्ये शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 2-1 असा मोठा विजय नोंदवल्यानंतर अफगाणिस्तान या मालिकेत आत्मविश्वासाने भरलेला असेल.

BAN vs AFG (Photo Credit - X)

Afghanistan National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात 6 नोव्हेंबरपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. तिन्ही एकदिवसीय सामने शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हे सर्व सामने सायंकाळी 5 वाजल्यापासून खेळवले जातील. वनडे फॉरमॅटमध्ये शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 2-1 असा मोठा विजय नोंदवल्यानंतर अफगाणिस्तान या मालिकेत आत्मविश्वासाने भरलेला असेल. अफगाणिस्तान क्रिकेटसाठी ऐतिहासिक मालिका विजय म्हणून हशमतुल्ला शाहिदीच्या संघाने शानदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिका संघाचा पराभव केला.

दोन्ही संघासाठी महत्वाची मालिका

ही एकदिवसीय मालिका अफगाणिस्तान आणि बांगलादेशसाठी खूप महत्त्वाची असणार आहे, कारण पाकिस्तानमध्ये खेळली जाणारी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फार दूर नाही. गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यानंतर, अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. (हे देखील वाचा: AFG vs BAN ODI Series 2024 Live Streaming: अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात रंगणार एकदिवसीय मालिका, 'इथे' जाणून घ्या भारतात कधी अन् कुठे पाहणार सामना)

दोन्ही संघाची हेड टू हेड आकडेवारी

अफगाणिस्तान आणि बांगलादेशचे संघ आतापर्यंत 16 वेळा एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये बांगलादेशचा वरचष्मा दिसत आहे. बांगलादेशने 16 पैकी 10 सामने जिंकले आहेत. तर अफगाणिस्तानने 6 सामने जिंकले आहेत. यावरून हे स्पष्ट होते की जेव्हा जेव्हा दोन्ही संघ एकमेकांशी भिडतात तेव्हा चुरशीची स्पर्धा होते. मात्र, बांगलादेशचा रेकॉर्ड चांगला असल्याने ते अधिक मजबूत दिसत आहे.

अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय सामन्यांमध्ये बांगलादेशच्या मुशफिकुर रहीमने सर्वाधिक धावा केल्या आहेत. मुशफिकर रहीमने अफगाणिस्तानविरुद्ध 15 सामन्यांच्या 14 डावांमध्ये 35.30 च्या सरासरीने 459 धावा केल्या आहेत. या कालावधीत मुशफिकुर रहीमने 4 अर्धशतके झळकावली असून 86 धावा ही सर्वोत्तम धावसंख्या आहे.

मुशफिकुर रहीम (बांगलादेश)- 459

शाकिब अल हसन (बांगलादेश)- 413

लिटन दास (बांगलादेश) - 391

हशमतुल्ला शाहिदी (अफगाणिस्तान)- 363

रहमानउल्ला गुरबाज (अफगाणिस्तान)- 341

अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज

अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय सामन्यात बांगलादेशच्या शाकिब अल हसनने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. शकिब अल हसनने अफगाणिस्तानविरुद्धच्या 15 सामन्यात 18.56 च्या सरासरीने आणि 4.16 च्या इकॉनॉमीने 30 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय बांगलादेशचा तस्किन अहमद या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. तस्किन अहमदने अफगाणिस्तानविरुद्धच्या 11 सामन्यात 19.50 च्या सरासरीने आणि 4.80 च्या इकॉनॉमीने 20 बळी घेतले आहेत. तर अफगाणिस्तानचा राशिद खान 19 विकेट्ससह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.

शाकिब अल हसन (बांगलादेश) - 30

तस्किन अहमद (बांगलादेश) - 20

राशिद खान (अफगाणिस्तान)- 19

मोहम्मद नबी (अफगाणिस्तान)- 17

फजलहक फारुकी (अफगाणिस्तान) - 15

अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश वनडे मालिका संघ

बांगलादेश एकदिवसीय संघ: सौम्या सरकार, तनजीद हसन, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह रियाद, तौहीद हृदोय, जॅक अली, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसैन, नसुम अहमद, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, नाहिद राणा.

अफगाणिस्तान एकदिवसीय संघ: हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमत शाह (उपकर्णधार), फरीद अहमद, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), नूर अहमद, सेदीकुल्ला अटल, फजलहक फारुकी, अल्लाह मोहम्मद गझनफर, रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), रियाझ हसन, रशीद खान, नांगियालाई खरोती, अब्दुल मलिक, मोहम्मद नबी, गुलबदीन नायब, अजमतुल्ला उमरझाई, दरविश रसूली, बिलाल सामी, नवी झदरन.