IPL Auction 2025 Live

लंडनमध्ये हार्दिक पंड्या याच्या पाठीच्या दुखापतीवर झाली शस्त्रक्रिया, सोशल मीडियावर फोटो केला शेअर

पंड्याने तिसऱ्यांदा त्याच्या पाठीवर उपचार केला आहे. हार्दिकने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे आणि त्याच्या यशस्वी शास्त्रक्रियेबाबत सांगितले आहेत.

हार्दिक पंड्या (Photo Credits: Instagram)

टीम इंडियाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या लोअर बॅकच्या समस्येवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पंड्याने तिसऱ्यांदा त्याच्या पाठीवर उपचार केला आहे. भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेदरम्यान त्याला पुन्हा पाठीचा त्रास उद्भवला होता. पंड्याने त्याच तज्ञाकडून उपचार करावाला आहे ज्याने त्याच्यावर 2018 आणि 2019 मध्ये उपचार केले होते. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या आशिया चषक दरम्यान हार्दिकला दुबईमध्ये ही समस्या पहिले जाणवली होती. पंड्या हा टीम इंडियाचा महत्वाचा सदस्य आहे आणि पाठीच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) नंतर कसोटी मालिकेतून बाहेर पडलेला तो दुसरा खेळाडू होता.दरम्यान, हार्दिकने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे आणि त्याच्या यशस्वी शास्त्रक्रियेबाबत सांगितले आहेत. (ट्रक ते मर्सिडीज जीप; हार्दिक पंड्या याने Throwback फोटो शेअर करत दिला संघर्षमयी जीवनाला उजाळा, शेअर केला टीम इंडियापर्यंतचा प्रवास)

या फोटोमध्ये हार्दिक हॉस्पिटलच्या मध्ये बेडवर पडलेला दिसत आहे. फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये हार्डीने लिहिले, "शस्त्रक्रिया यशस्वीरित्या झाली, शुभेच्छाबद्दल प्रत्येकाचे मनापासून आभार. मी लवकरच परत येईन! तोपर्यंत माजी आठवण काढा." यापूर्वी बोर्डच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आयएएनएसला सांगितले, 'तज्ञ आन पंड्याएकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत असल्याने समजतात. आम्ही विश्वचषक खेळत असतानाही तो त्या डॉक्टरकडे गेला होता. आपल्याला हे समजले पाहिजे की प्रत्येक खेळाडू पूर्णपणे 100 टक्के तंदुरुस्त असू शकत नाही. त्यांना काही समस्या असतात. त्यांना मदत करण्यासाठी फिजिओ आहेत, परंतु काही वेळाने आपल्याला काही महत्वपूर्ण पावले उचलावी लागतील."

 

View this post on Instagram

 

Surgery done successfully 🥳 Extremely grateful to everyone for your wishes ❣️ will be back in no time ! Till then miss me 😉

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

दरम्यान, बांगलादेशविरुद्ध संपूर्ण मालिकापासून हार्दिकला मुकावे लागणार आहे कारण तो कधीपर्यंत तो पूर्णपणे ठीक होईल हे सांगणे कठीण आहे. हार्दिक इंग्लंडमधून परत आल्यावरच याबद्दल माहिती मिळेल. यापूर्वी सांगितले जात होते की, शस्त्रक्रियेनंतर हार्दिकला जवळपास पाच महिने तर क्रिकेटपासून लांब राहावे लागू शकते.