Hardik Pandya Natasa Divorce: सगळ संपलं! हार्दिक पांड्याला एकाच दिवसात दोन धक्के, आधी कर्णधारपदावरुन हक्कलपट्टी आता चार वर्षांचा संसार मोडला

त्याला एकाच दिवसात दोन झटके आले. आधी टीम इंडियाच्या (Team India) कर्णधारपदाची संधी पांड्याकडून हिसकावण्यात आली आणि आता त्याच्या घटस्फोटाच्या बातम्यांना पुष्टी मिळाली आहे.

Hardik Pandya Natasa Divorce (Photo Credit - X)

Hardik Pandya-Natasa Stankovic Divorce: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पत्नी नताशा स्टॅनकोविचसोबत (Natasha Stankovic) विभक्त झाला आहे. या दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. पांड्यासाठी गुरुवारचा दिवस खूप कठीण होता. त्याला एकाच दिवसात दोन झटके आले. आधी टीम इंडियाच्या (Team India) कर्णधारपदाची संधी पांड्याकडून हिसकावण्यात आली आणि आता त्याच्या घटस्फोटाच्या बातम्यांना पुष्टी मिळाली आहे. पांड्या आणि नताशा यांचे नाते सुमारे 4 वर्षे टिकले. नताशा आणि पांड्या यांच्या घटस्फोटाच्या बातम्या खूप दिवसांपासून गाजत होत्या. पण गुरुवारी त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून वेगळे झाल्याची घोषणा केली. पांड्या आणि नताशाला एक मुलगाही आहे. परस्पर संमतीने दोघांनीही आपला मुलगा अगस्त्यसाठी सहपालक होण्याचा निर्णय घेतला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hardik Himanshu Pandya (@hardikpandya93)

टीम इंडियाच्या कर्णधारपदाची संधी हिरावून घेतली पांड्याकडून -

बीसीसीआयने गुरुवारी संध्याकाळी श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली. बीसीसीआयच्या निवड समितीने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी पांड्याला संघात स्थान दिले आहे. पण त्याला टी-20 चा कर्णधार बनवण्यात आले नाही. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्ती जाहीर केली आहे. आता त्याच्या जागी पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्यात कर्णधारपदासाठी स्पर्धा होती. पण सूर्याचा विजय झाला. सूर्याला टी-20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले.

हे देखील वाचा: Hardik Pandya: हार्दिक पंड्याचं बडोद्यात जोरदार स्वागत; हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत भव्य रोड शो (Watch Video)

2020 मध्ये लग्न आणि आता घटस्फोटाचा निर्णय 

पांड्या आणि नताशाचे 2020 मध्ये लग्न झाले. त्याच वर्षी त्यांचा मुलगा अगस्त्य जन्मला. पण आता तब्बल 4 वर्षांनंतर पांड्या आणि नताशाने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी इंस्टाग्रामवर एक नोट शेअर करून ही माहिती दिली आहे. अशाप्रकारे हार्दिकला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले.