हार्दिक पंड्या ने शेअर केला 9 वर्ष जुना फोटो, ट्रोल करत यूजर्स म्हणाले-'वहिनीला नको दाखवू'

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याने त्याचा क्रिकेटपटू मोठा भाऊ कृणाल पंड्यासोबत इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. हार्दिकने शेअर केलेला फोटो पाहताच यूजर्सने त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. विशेष म्हणजे फक्त नेटकरीच नव्हे तर त्याचे टीम इंडिया सहकाऱ्यांनी देखील ट्रोल केले. यूजर्सने पंड्याच्या या फोटोवर फिरकी घेतली. एका यूजरला विमल पान मसाल्याची आठवण आली

हार्दिक आणि कृणाल पंड्या (Photo Credit: Instagram/hardikpandya93)

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने त्याचा क्रिकेटपटू मोठा भाऊ कृणाल पंड्यासोबत (Krunal Pandya) इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. पंड्या बंधूंचा हा फोटो 2011 चा आहे, आजची तुलना करता पंड्याने लिहिले की, "काळ कसा बदलला आहे." 2011 मध्ये दोघे पंड्या बंधू 'देसी स्वैग'मध्ये फोटोसाठी पोज केली. कोरोना व्हायरसमुळे क्रीडा स्पर्धा रद्द झाल्याने अनेक खेळाडू सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात बनवून आहेत. भारतात 3 मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. या लॉकडाउन दरम्यान सोशल मीडियावर #MeAt20 ट्रेंड होत आहे. यामध्ये यूजर्स 20 वर्षाचे असतानाचे फोटो शेअर करत आहे. आणि आता या लिस्टमध्ये पंड्या बंधुंचाही समावेश झाला आहे. मात्र हा फोटो त्याचा 20 वर्षाचा असतानाचा नाही. 2011 मध्ये हार्दिक 17 वर्षाचा आणि कृणाल 20 वर्षाचा होता. ('बेबी मैं क्या हूं तेरा' हार्दिक पंड्याच्या प्रश्नाला गर्लफ्रेंड नताशा स्ताकोविक ने दिलेले उत्तर ऐकून नक्की तुम्हालाही फुटेल हसू, पाहा Video)

हार्दिकने शेअर केलेला फोटो पाहताच यूजर्सने त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. विशेष म्हणजे फक्त नेटकरीच नव्हे तर त्याचे टीम इंडिया सहकाऱ्यांनी देखील ट्रोल केले. मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने त्यांना 'करण-अर्जुन' म्हटले तर, 2011 वर्ल्ड कप विजेत्या टीमचे आणि आयपीएल टीमचे माजी सदस्य मुनाफ पटेलने फोटोला सॉलिड म्हटले.

 

View this post on Instagram

 

Throwback to 2011 😅 How time changes @krunalpandya_official Swag mera desi hai

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

(Photo Credit: Instagram/hardikpandya93)
(Photo Credit: Instagram/hardikpandya93)

दुसरीकडे, यूजर्सनेही पंड्या बंधूंच्या या फोटोवर फिरकी घेतली. एका यूजरला विमल पान मसाल्याची आठवण आली, तर दुसरा म्हणाला 'देसी को विदेशी मिल गायी.'

(Photo Credit: Instagram/hardikpandya93)
(Photo Credit: Instagram/hardikpandya93)

9 वर्ष जुन्या या फोटोत हार्दिकने स्टाइलिश ब्लॅक शर्ट आणि गुलाबी शेडचे गॉगल घातले आहेत. त्याचा मोठा भाऊ, त्याच्याबरोबर उभा कृणालने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे. 9 वर्षांपूर्वी क्रिकेट विश्वात पंड्या बंधूंना कोणी ओळखत नव्हते, पण आज हे दोन्ही अष्टपैलू भाऊ भारतीय संघाचे मुख्य खेळाडू आहेत. हार्दिक हा तिन्ही फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू आहे, तर मोठा भाऊ क्रुणाल अद्याप एकदिवसीय आणि कसोटी सामन्यात खेळू शकलेला नाही.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement