Video: शस्त्रक्रियेनंतर हार्दिक पंड्या याने केले पुनरागमन, अशा प्रकारे करत आहे प्रशिक्षण
भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्या फिटनेसबाबत मागील एका वर्षात बरेच प्रश्न उपस्थित झाले आहेत. दुखापतीमुळे त्याला मागील एका वर्षात बरेच महत्वाचे सामने खेळता आले नाहीत. आता पुन्हा तो आपल्या फिटनेसवर खूप काम करत आहे. पंड्याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये तो मैदानात धावताना आणि जिममध्ये कसरत करताना दिसत आहे.
भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या फिटनेसबाबत मागील एका वर्षात बरेच प्रश्न उपस्थित झाले आहेत. दुखापतीमुळे त्याला मागील एका वर्षात बरेच महत्वाचे सामने खेळता आले नाहीत. आता पुन्हा तो आपल्या फिटनेसवर खूप काम करत आहे. काही महिन्यांपूर्वी हार्दिकच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर, ताईने प्रशिक्षण सुरू केले आहे. ज्यामुळे तो लवकरच भारतीय संघात पुनरागमन करू शकेल. पंड्याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये तो मैदानात धावताना आणि जिममध्ये कसरत करताना दिसत आहे. यावर्षी सप्टेंबरमध्ये हार्दिकने दक्षिण आफ्रिकाविरूद्ध भारतीय संघाच्या जर्सीमध्ये अंतिम वेळी दिसला होता. पंड्यावर ऑक्टोबरमध्ये पाठीच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या वर्षाच्या सुरुवातीला हार्दिकने पाठीच्या खालच्या भागात दुखण्याची तक्रार केली होती. (बेबी स्टेप, व्हील चेअर... लंडनमध्ये Lower Back वर शस्त्रक्रियेनंतर हार्दिक पंड्या Recovery च्या मार्गावर, पहा Video)
पंड्याने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करून लिहिले की, “मी बऱ्याच काळापासून मैदानाबाहेर गेलो आहे. मैदानावर परत येण्यापेक्षा चांगली भावना नाही." शास्त्रक्रियेनंतर काही दिवसांपूर्वी हार्दिक चालायला लागला होता. त्यानंतर, आता त्याने धावण्यास सुरवात केली आहे. त्याने आपल्या फिटनेससाठी बराच वेळ दिला आहे आणि लवकरच तो एनसीएलाही जाऊ शकतो. इंडियन प्रीमियर लीगचे विद्यमान विजेत्या मुंबई इंडियन्सने रिट्विट केले आणि लिहिले, "पूर्ण फिटनेसकडे परत येत आहे." पाहा व्हिडिओ:
View this post on Instagram
Been too long since I've been out there. No better feeling than to be back on the field 💪🏃♂🔥
A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on
मुंबई इंडियन्स
लोअर बॅक शस्त्रक्रियेमुळे हार्दिक बांगलादेश विरुद्ध कसोटी आणि टी-20 मालिकेतही खेळू शकला होता. याशिवाय वेस्ट इंडीज विरुद्ध हार्दिक आगामी मालिकेत खेळणार नाही. अशा परिस्थितीत पुढील वर्षी हार्दिक ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन करू शकेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. ऑस्ट्रेलिया पुढील वर्षी 14 ते 19 जानेवरीदरम्यान भारत दौऱ्यावर येणार आहे. सध्या तो वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहतो. 25 वर्षीय पंड्याने टीम इंडियाकडून आजवर 11 टेस्ट आणि 54 वनडे तसेच 40 टी-20 सामने खेळले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)