Hardik Pandya: हार्दिकने मोडला विराटचा ‘हा’ खास विक्रम; बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात केली कामगिरी

हार्दिक पंड्याने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात सामन्यात चांगल्या कामगिरीच्या जोरावर त्याने विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजयी षटकार ठोकणारा भारतीय खेळाडू तो बनला आहे.

Photo Credit- X

Hardik Pandya broke Virat Kohli record for most match winning sixes in T20I: भारताचा बांगलादेश(INDv vs BAN) विरुद्धचा सामना ग्वाल्हेर येथे झाला. पहिल्या टी-20 सामन्यात बांगलादेशचा भारताने 7 गडी राखून पराभव केला. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. हा सामना जिंकत भारताने चांगली कामगिरी तर दाखवली. पण, त्याशिवायदेखील एक मोठी गोष्ट झाली आहे. ती म्हणजे हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) विराट कोहलीचा (Virat kohli) एक खास विक्रम मोडला आहे. तो म्हणजे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजयी षटकार ठोकणारा भारतीय खेळाडू तो बनला आहे. (हेही वाचा:Ireland vs South Africa 3rd ODI Pitch Report: तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात फलंदाज की गोलंदाज गाजवणार मैदान? अबुधाबीच्या खेळपट्टीचा अहवाल आणि हवामानाची स्थिती जाणून घ्या )

बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना भारताला विजयासाठी 128 धावांचे लक्ष्य दिले होते. जे टीम इंडियाने 11.5 षटकांत 3 गडी गमावून सहज गाठले. भारतासाठी वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या आणि नितीश रेड्डी यांनी चमकदार कामगिरी केली. या खेळाडूंमुळेच टीम इंडिया विजयाची नोंद करण्यात यशस्वी ठरली.

विराट कोहलीने तो विक्रम करताना टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 वेळा षटकार मारून सामना जिंकून दिला होता. तर, आता टीम इंडियाकडून हार्दिक पंड्याने 16 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांसह 39 धावा केल्या. त्याने तस्किन अहमदच्या षटकात षटकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. हार्दिकने आतापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 वेळा षटकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. या यादीत महेंद्रसिंग धोनी आणि ऋषभ पंत यांचाही समावेश आहे. या दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी तीन वेळा षटकार मारून टी-20 सामना जिंकून दिला आहे.

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजयी षटकार ठोकणारे भारतीय खेळाडू:

हार्दिक पंड्या- 5 षटकार

विराट कोहली- 4 षटकार

एमएस धोनी- 3 षटकार

ऋषभ पंत- 3 षटकार

शिवम दुबे- 1 षटकार

हार्दिक पांड्याची कारकीर्द

हार्दिक पड्या भारतासाठी 2024 च्या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद जिंकणाऱ्या संघाचा सदस्य आहे. 2016 मध्ये त्याने भारतीय संघासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने एकूण 103 टी-20 सामन्यांत 87 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय 1562 धावाही केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 84 आणि कसोटीत 17 विकेट्स आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now