Hardik Pandya-Natasa Stankovic Maternity Photoshoot: हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविचचे 'हे' रोमँटिक मॅटर्निटी फोटोशूट पाहून तुम्हीही पडाल त्यांच्या प्रेमात, पाहा Photos

सर्बियन नर्तिका-अभिनेत्री नताशा स्टेनकोविच सध्या तिच्या गर्भावस्थेच्या टप्प्याचा भरपूर आनंद घेत आहेत. अशा परिस्थितीत नताशाने पती आणि क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासोबत फोटोशूट केले असून, दोघांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. अभिनेत्री पत्नीसह आपल्या पहिल्या मुलाची प्रतीक्षा करणारा हार्दिक विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दोघांचे मनमोहक फोटो शेअर करत आहे.

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविचचे मॅटर्निटी फोटोशूट (Photo Credit: Instagram)

सर्बियन नर्तिका-अभिनेत्री नताशा स्टेनकोविच (Natasa Stankovic) सध्या तिच्या गर्भावस्थेच्या टप्प्याचा भरपूर आनंद घेत आहेत. अशा परिस्थितीत नताशाने पती आणि क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासोबत (Hardik Pandya) फोटोशूट केले असून, दोघांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. नताशाने आणि हार्दिकने मॅटर्निटी फोटोशूट (Natasa-Hardik Maternity Photoshoot) केलं ज्यामध्ये नताशा निळाशार ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे, तर हार्दिकने काळ्या रंगाचं टी-शर्ट आणि पँट घातली आहे. हार्दिकने सर्वांना चकित करत 31 मे रोजी नताशा प्रेग्नन्ट असल्याचं जाहीर केलं. लॉकडाऊन दरम्यान दोघांनी लग्न केले आणि ही बातमी त्याच्या चाहत्यांसाठी आश्चर्यचकित करणारी ठरली. अभिनेत्री पत्नीसह आपल्या पहिल्या मुलाची प्रतीक्षा करणारा हार्दिक विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दोघांचे मनमोहक फोटो शेअर करत आहे. (विराट कोहलीच्या 'क्लॅप पुश-अप्स'ला हार्दिक पांड्याच दमदार उत्तर, पाहा तुम्हाला जमतेय का 'ही' नवीन एक्सरसाइज Watch Video)

सध्याच्या फोटोशूटमध्ये हार्दिक आणि नताशा खूपच सुंदर स्टाईलमध्ये एकमेकांसोबत दिसत आहेत. मोकळं आकाश, हिरवंगार गवत आणि डोक्यावर सूर्यकिरण अशा सुंदर वातावरणात हार्दिक आणि नताशा एकमेकांचे हात धरून चांगला वेळ घालवताना दिसत आहेत. हार्दिक आणि नताशाने या फोटोशूटमधील फोटो इंस्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांसह शेअर केले जे खूप वेगाने व्हायरल होत आहे. दोघांचे हे रोमँटिक फोटो पाहून तुम्ही देखील त्यांच्या प्रेमात पडाल इतके सुंदर फोटो आहेत दोघांचे. पाहा:

तू मला पूर्ण करतोस

 

View this post on Instagram

 

You complete me ❣️ @hardikpandya93 📸 @rahuljhangiani Styled by @begborrowstealstudio dress by @babitamalkani Hardik’s stylist - @nikitajaisinghani

A post shared by Nataša Stanković✨ (@natasastankovic__) on

सुंदर जोडपं

 

View this post on Instagram

 

❤️✨ @hardikpandya93 Photographer- @rahuljhangiani Hardik’s stylist - @nikitajaisinghani Natasa’s stylist - @begborrowstealstudio Dress by @zwaan.official

A post shared by Nataša Stanković✨ (@natasastankovic__) on

सुंदर

 

View this post on Instagram

 

💝 Photographer- @rahuljhangiani Hardik’s stylist - @nikitajaisinghani Natasa’s stylist - @begborrowstealstudio

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

आनंदाच्या दिशेने वाटचाल

 

View this post on Instagram

 

Walking towards happiness 💝💐

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

गोंडस

 

View this post on Instagram

 

💐💝🥰 Photographer- @rahuljhangiani Hardik’s stylist - @nikitajaisinghani Natasa’s stylist - @begborrowstealstudio

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

कुटुंब

 

View this post on Instagram

 

Family 💫💝 Photographer- @rahuljhangiani Hardik’s stylist - @nikitajaisinghani Natasa’s stylist - @soodpranav

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

1 जानेवार रोजी हार्दिकने नताशाशी गुपचूप साखरपुडा करुन सर्वांना चकित केले होते. या दोघांच्या साखरपुड्याचा व्हिडीओ आणि फोटोंबाबत सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती. दोघांनी नवीन वर्षाच्या निमित्ताने गुड न्यूज शेअर करत सर्वांना साखरपुड्याची माहिती देत आश्चर्याचा धक्का दिला होता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now