टीम इंडियाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या Lion King च्या प्रेमात, हातावर गोंदवला खास टॅटू; चाहत्यांनी दिली दाद

आणि तो सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. हार्दिकने त्याच्या हातावर एक नवा टॅटू गोंदवाला आहे. हार्दिकने त्याच्या हातावर सिंहाचा फोटो गोंदवला आहे.

हार्दिक पंड्या (Photo Credit: Hardik Pandya/Instagram)

भारतीय संघ आगामी वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यासाठी सज्ज होत आहे. बीसीसीआय (BCCI) निवड समितीकडून रविवारी या दौऱ्यासाठी संघाची घोषणा करण्यात आली होती. वेस्ट इंडिज टी-20, वनडे आणि टेस्ट मालिकेसाठी संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे असणार आहे. तर या दौऱ्यासाठी अनेक युवा खेळाडूंना देखील संधी देण्यात आली आहे. टीम इंडियाचा विंडीज दौरा 3 ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. सर्व चाहत्यांचे लक्ष संघात निवड झालेल्या युवा खेळाडूंकडे असणार आहे कारण त्यांना संघातील मोठे चर्चित नावं-एमएस धोनी (MS Dhoni), हार्दिक पंड्या (Hardik Pandya), जसप्रीत बुमराह यासारख्या खेळाडूंच्या जागी खेळण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे या खेळाडूंचे प्रदर्शन महत्वाचे असणार आहे. दरम्यान, विश्वचषकमध्ये संतोषजनक कामगिरी केल्यानंतर अष्टपैलू हार्दिकला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे हार्दिक सध्या आपल्या मोकळ्या वेळेचा आनंद लुटत आहे. (बांगलादेशमध्ये होणार आशिया XI आणि वर्ल्ड XI मध्ये टी-20 घमासान, विश्वक्रिकेटमधील चर्चित खेळाडू होऊ शकतात सहभागी)

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिकने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. आणि तो सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. सध्या फिल्मविश्वात लायन किंग (Lion King)ची चर्चा जोट सुरु आहे. नवीन आलेला लायन किंग सिनेमाला सर्वांची पसंती मिळाली आहे. आणि हार्दिकदेखील याच्या प्रेमात पडला आहे. क्रिकेटमधून थोडा वेळ काढत हार्दिकने त्याच्या हातावर एक नवा टॅटू गोंदवाला आहे. हार्दिकने त्याच्या हातावर सिंहाचा फोटो गोंदवला आहे. आणि त्याचा फोटो त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. आणि चाहत्यांना देखील त्याचा हा नवीन टॅटू आवडलेला दिसतोय. हार्दिकने शेअर केलेल्या फोटोवर प्रतिक्रिया देत चाहत्यांनी देखील त्याच्या या लायन टॅटूचे कौतुक केले आहे.  पहा हा फोटो:

हार्दिक पंड्या (Photo Credit: Hardik Pandya/Instagram)

पंड्याला आगामी वेस्ट इंडिज दौऱ्याच्या टी-20, वनडे आणि टेस्ट सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. नुकतेच संपुष्टात आलेल्या क्रिकेट विश्वचषकमध्ये हार्दिकला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करु शकला नाही. आणि अनेकदा मोक्याच्या क्षणी आपली विकेट गमावली.