बेबी स्टेप, व्हील चेअर... लंडनमध्ये Lower Back वर शस्त्रक्रियेनंतर हार्दिक पंड्या Recovery च्या मार्गावर, पहा (Video)

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याच्यावर लंडनमध्ये लोअर बॅकच्या दुखापतीवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. आता तो उभं राहून चालू लागला आहे. 25 वर्षीय हार्दिकने त्याच्यावरच्या शास्त्रक्रियेनंतरची स्थिती शेअर केली आहे.

हार्दिक पंड्या (Photo Credit: Instagram)

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्यावर लंडनमध्ये लोअर बॅकच्या दुखापतीवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. आता तो उभं राहून चालू लागला आहे. 25 वर्षीय हार्दिकने त्याच्यावरच्या शास्त्रक्रियेनंतरची स्थिती शेअर केली आहे. पंड्याने मंगळवारी रात्री हा व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये तो हॉस्पिटलच्या पलंगाचा आधार घेत हळू हळू फिरण्यास सक्षम असल्याचे दिसते आहे. यासह हार्दिकही व्हील चेअरवर बसलेला दिसत आहे. तो कॉरिडॉरमध्ये स्वत: व्हील चेअर चालवतानाही दिसला. फिजिओथेरपिस्ट योगेश परमार त्याच्यासोबत लंडनमध्ये आहेत. या व्हिडिओवर पंड्याच्या चाहत्यांनाही लवकरात लवकर बरे होण्याची शुभेच्छा दिल्या आहेत. (हार्दिक पंड्या च्या Birthday Wish ट्विटवर झहीर खान ने दिले मजेदार प्रत्युत्तर, पहा Tweet)

व्हिडिओ शेअर करत हार्दिकने कॅप्शनमध्ये लिहिले, "छोटी पावले... पण माझ्या पूर्ण फिटनेसची वाट इथूनच सुरु होते आणि आता प्रत्येकाने दिलेले शुभेच्छा आणिसमर्थनाबद्दल धन्यवाद... याचे खूप महत्व आहे." यापूर्वी, शनिवारी हार्दिकने त्याच्यावरील यशस्वी शास्त्रक्रियेबाबत माहिती दिली. यावर त्याला क्रिकेट विश्वाकडून आणि चाहत्यांकडून शुभेच्छा देण्यात आल्या होत्या.

 

View this post on Instagram

 

Baby steps .. but my road to full fitness begins here and now 💪 Thank you to everyone for their support and wishes, it means a lot 🙏

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

हार्दिकने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध अंतिम टी-20 दरम्यानच्या मॅचनंतर लोअर बॅकच्या दुखापतीची तक्रार केली होती. याच्यानंतर तज्ञांचा सल्ला घेत हार्दिकवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यानंतर हार्दिक शस्त्रक्रियेसाठी लंडनला रवाना झाला. आणि आता शस्त्रक्रियेनंतर हार्दिकला सुमारे चार महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागणार आहे. असे म्हटले जात आहे की, हार्दिकला कमीतकमी 12 ते 16 आठवडे (तीन ते चार महिने) क्रिकेटपासून दूर रहावे लागेल आणि तो आयपीएलपूर्वी (इंडियन प्रीमियर लीग) फिट होण्याची अपेक्षा आहे. पंड्या हा टीम इंडियाचा महत्वाचा सदस्य आहे आणि पाठीच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) नंतर कसोटी मालिकेतून बाहेर पडलेला तो दुसरा खेळाडू होता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement