IND vs NZ 1st T20I 2022: हार्दिकसमोर सलामीवीर निवडण्याचे आव्हान; 4 खेळाडू दावेदार, ही असू शकते टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

18 नोव्हेंबर (शुक्रवार) पहिला सामना खेळवला जाणार आहे. वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात टीम इंडिया आपल्या युवा खेळाडूंवर विसंबून विजयाने सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल.

IND vs NZ 1st T20I 2022: हार्दिकसमोर सलामीवीर निवडण्याचे आव्हान; 4 खेळाडू दावेदार, ही असू शकते टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन
Team India (Photo Credit - Twitter)

टीम इंडिया (Team India) टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 WC 2022) पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) सारख्या वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत, हार्दिकच्या नेतृत्वाखाली, न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळेल. 18 नोव्हेंबर (शुक्रवार) पहिला सामना खेळवला जाणार आहे. वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात टीम इंडिया आपल्या युवा खेळाडूंवर विसंबून विजयाने सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल. मात्र, त्याआधी प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) आणि कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान असेल ते प्लेइंग इलेव्हन निवडण्याचे.

कोणाला मिळणार संधी

हार्दिक पांड्या संघाचा कर्णधार आणि ऋषभ पंत उपकर्णधार आहे, त्यामुळे हे दोघेही खेळणार आहेत. याशिवाय संघाचा प्रमुख सूर्यकुमार यादवही खेळताना दिसणार आहे. विराट कोहलीच्या जागी श्रेयस अय्यरचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर वर्ल्ड कपमध्ये बेंचवर असलेला स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहललाही खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अक्षर पटेलच्या जागी वॉशिंग्टन सुंदर खेळणार आहे, तर वेगवान गोलंदाजीत अर्शदीप सिंहचे स्थानही निश्चित झाले आहे. उमरान मलिक आणि मोहम्मद सिराज यांना वेगवान गोलंदाजीच्या अन्य पर्यायांसाठी संधी मिळू शकते.

ओपनिंग मध्ये कोणते असणार पर्याय

रोहित आणि राहुलची कमतरता भरून काढण्यासाठी संघाकडे चार पर्याय आहेत. त्यापैकी डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन हा प्रमुख दावेदार आहे. त्याच्याशिवाय उजव्या हाताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन हाही पर्याय असेल. त्याचवेळी उजव्या हाताचा सलामीवीर आणि नुकतेच टी-20 मध्ये पहिले शतक झळकावणाऱ्या शुभमन गिलला पदार्पणाची संधी मिळू शकते. याशिवाय दीपक हुड्डालाही सलामीसाठी पर्याय आहे. (हे देखील वाचा: IND vs NZ 1st T20I 2022: शुक्रवारी किवी गोलंदाजांची होणार धुलाई, भारताचे युवा फलंदाज करत आहे जोरदार सराव (Watch Video)

ही असू शकते प्लेइंग इलेव्हन 

शुभमन गिल, इशान किशन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), संजू सॅमसन, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंह आणि मोहम्मद सिराज

(The above story first appeared on LatestLY on Nov 17, 2022 01:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).