Ashes 2019: अॅशेसने प्रभावित होऊन सौरव गांगुलीने केली होती ही मागणी, प्रत्युत्तरात हरभजन सिंग याने केले हे मोठे विधान
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणार्या अॅशेसने क्रिकेटला जिवंत ठेवल्याचे मोठे वक्तव्य गांगुलीने केले होते. हरभजन सिंहने एका शानदार ट्विटद्वारे तो गांगुली उर्फ दादासोबत अॅशेसच्या समर्थानात बॅटिंग केली.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) अॅशेस (Ashes) मालिकेत खेळल्या जाणार्या क्रिकेटने खूपच प्रभावित झाला आहे. ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड (England) यांच्यात खेळल्या जाणार्या अॅशेसने क्रिकेटला जिवंत ठेवल्याचे मोठे वक्तव्य गांगुलीने केले होते. यानंतर आपल्या कर्णधाराला साथ देण्यासाठी हरभजन सिंह (Harbhajan Singh) मैदानात उतरला आणि एका शानदार ट्विटद्वारे तो गांगुली उर्फ दादासोबत अॅशेसच्या समर्थानात बॅटिंग केली. बर्मिंगहॅम येथे खेळलेला पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला तर लॉर्ड्सच्या मैदानावर खेळलेला दुसरा सामना बरोबरीत राहिला. अश्या परिस्थितीत अॅशेस मालिकेदरम्यान टेस्ट क्रिकेटमधील दोन दर्जेदार संघांमधील टक्कर पाहून गांगुली म्हणतो की आता इतर संघांनीही आपली पातळी वाढवायाला हवी. (Ashes 2019: हेडिंगले टेस्टसाठी इंग्लंड संघ जाहीर; ऑस्ट्रेलियासाठी स्टिव्ह स्मिथ याची दुखापत डोकेदुखी, वाचा सविस्तर)
गांगुलीने ट्विट केले की, "अॅशेस मालिकेने कसोटी क्रिकेटला जिवंत ठेवले आहे. आता इतर देशांनादेखील आपला दर्जा वाढवायला हवा." याच्या प्रत्युत्तरात हरभजन म्हणाला की, “जर संघ मजबूत असतील तरच त्यांच्या खेळाचे स्तर खेळ मजबूत ठेवू शकतात. शिवाय, भज्जीला वाटते की जगात फक्त चार आहेत जे उच्च दर्जाचे आहेत. यात भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड घातक सिद्ध होऊ शकतात. आणि इतर कोणतीही संघ त्यांच्याइतका मजबूत नाही.
हरभजन सिंह
दरम्यान, पाच सामन्यांच्या अॅशेस मालिकेतील तिसरा सामना गुरुवारी हेडिंगले मैदानावर होईल. पहिला सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी मिळवली आहे आणि दुसरा सामान ड्रॉ झाला. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात इंग्लंड ऑस्ट्रेलिया संघाशी बरोबरी सांधण्याची निर्धारित असेल. ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडचा जोफ्रा आर्चर घातक ठरू शकतो. दुसऱ्या सामन्यात आर्चरने प्रभावी खेळीकरत ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या नाकीनऊ आणले. शिवाय आर्चरच्या एका चेंडूवर स्टिव्ह स्मिथ याला गंभीर दुखापत झाली. ज्यामुळे तो दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला नाही.