Happy Birthday Sourav Ganguly: प्रेयसीला प्रोपोज करुन दादा इग्लंड दौऱ्यावर, विवाह न करताच जोडी अर्ध्या रस्त्यावरुन परत, वाचा सौरव गांगुली - डोना रॉय Love Story
वाढदिवसानिमित्त वाचा सौरव गांगुली आणि डोना लव्ह स्टोरी. एखादी कथा, कादंबरी वाचल्याची येऊ शकते अनुभुती.
Sourav Ganguly and Dona Roy-Ganguly Love Story: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आज आपला 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून आक्रमक असलेल्या सौरव गांगुलीची प्रत्येक खेळी ही चर्चीत ठरली. प्रसारमाध्यमांपासून ते थेट सर्वसामान्य क्रिडा चाहत्यापर्यंत सर्वांनाच सौरव गांगुली अर्थातच दादाच्या अनेक गोष्टींबाबत उत्सुकता. दादाची लव्ह स्टोरीही जोरदार चर्चेचा विषय ठरली. खरं म्हणजे सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि डोना रॉय - गांगुली (Dona Roy-Ganguly) यांची लव्ह स्टोरी एखाद्या फिल्मी स्टोरीला कमी नव्हती. वाढदिवसानिमित्त वाचा सौरव गांगुली आणि डोना लव्ह स्टोरी. एखादी कथा, कादंबरी वाचल्याची येऊ शकते अनुभुती.
शालेय जीवनातच झाले प्रेम
सौवर याची पत्नी डोना पेशाने एक ओडिसी डान्सर होती. डोना सौरव गांगुलीच्या घराजवळच राहात असे. शालेय जीवनापासूनच सौरव डोना हिच्या प्रेमात पडला. तसे दोघेही एकमेकांना ओळखत होते. अगदी लहानपणापासून. सौरव जेव्हा फुटबॉल खेळाचा सराव करणयासाठी मैदानावर जात असे तेव्हा डोना रॉय हिसुद्धा तिथूनच ये जा करत असे. दरम्यानच्या काळात दोघांमध्ये बोलणे होत असे. सुरुवातीला तुरळक आणि हलकंफुलकं बोलणं प्रेमात कसं बदललं हे दोघांनाही कळलं नाही. सौरव सेंट जेवियर स्कूलमध्ये शिक्षण घेत होता तर, डोना लोरेटो कॉन्वेंटमध्ये. सौरव आणि डोना एकमेकांवर इतके प्रेम करायचे की, एकमेकांना भेटण्यासाठी ते एकमेकांच्या शाळेत जात असत. हे प्रेम पुढे फुलंतच गेलं.
प्रेयसीला प्रोपोज करुन सौरव गांगुली इग्लंड दौऱ्यावर
सन 1996 मध्ये भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर निघाला होता. अर्थातच या संघात सौरवही होता. दरम्यान, दौऱ्यावर जाण्यापूर्वी सौरव गांगुली याने डोना हिला प्रपोज केले. डोना आणि सौरव यांचे परिवार एकमेकांना ओळखतही होते. काही व्यवसायात दोन्ही कुटुंबांची व्यावसायिक भागिदारीही होती. परंतु, काही कारणांमुळे दोन्ही कुटुंबात ताणतणाव होते. त्यामुळे त्यांच्यातील संवाद थांबला होता. नेमकी हीच गोष्टी डोना आणि सौरव यांच्यासाठी अत्यंत अडचणीची होती. (हेही वाचा, Happy birthday Sourav Ganguly: फुटबॉल चाहता सौरव गांगुली झाला क्रिकेटर, डावखुरा फलंदाज होण्यामागेही मोठी कहाणी; वाचा दादाच्या आयुष्यातील 10 मजेदार गोष्टी)
विवाह न करताच अर्ध्या रस्त्यातून जोडी माघारी
सौरव आणि डोना रॉय दोघांनी लग्न करायचे ठरवले. तशी घरातल्यांना कल्पनाही दिली. परंतू, दोन्ही कुटुंबातून नकार आला. दरम्यान, सौरव गांगुली याची निवड टीम इंडियात झाली. जून 1996 मध्ये सौरव इंग्लंड दौऱ्यावर गेला. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सौरवने शतक ठोकले. इग्लंड दौऱ्यावरुन परत आल्यावर सौरव गांगुली याने आपल्या मित्रांच्या मदतीने कोर्टमॅरेज करण्याचा निर्णय घेतला. सौरव आणि डोना दोघे विवाह करण्यासाठी रजिस्ट्रार ऑफिसमध्ये पोहोचले. परंतू, त्यांना अर्ध्या रस्त्यातून परत यावे लागले. कारण, तोपर्यंत दोघांच्या विवाहाची बादमी प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे त्यांनी अर्ध्या वाटेवरुन परत फिरने पसंत केले. त्यानंतर दोघांनी मॅरेज रजिस्ट्रार यांना आपल्या घरी बोलवून गुपचूप कोर्ट मॅरेज उरकले. तो दिवस होता 12 ऑगस्ट 1996. याच दिवशी डोना रॉय आणि सौरव गांगुली यांच्या प्रेमाचे रुपांत विवाहात झाले.
मियां-बीबी राजी तो क्या करेगा काजी
गुपचूप उरकलेल्या कॉर्ट मॅरेजची ही गोष्ट फार काळ लपून राहिली नाही. दोघांच्याही घरच्यांना पत्ता लागलाच. या विवाहावरुन दोघांच्याही घरच्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. हा विवाह सुरुवातील त्यांनी स्वीकारलाच नाही. परंतु, 'मियां-बीबी राजी तो क्या करेगा काजी', या म्हणीप्रमाणे काही दिवसांनंतर दोघांच्या घरच्यांनी हा विवाह स्वीकारला आणि 21 फेब्रुवारी 1997 मध्ये त्यांचा दुसऱ्यांदा विवाह लाऊन दिला. तोही धुमधडाक्यात.