Happy Birthday Sourav Ganguly: सौरव गांगुली, एक कर्णधार ज्याने टीम इंडियाला शिकवली 'दादागिरी', दादाच्या क्रिकेटमधील दादागिरीचे 'हे' किस्से जाणून घ्या
माजी कर्णधार आणि सध्याचे बीसीसीआय अध्यक्षसौरव गांगुली यांनी कर्णधारपद सांभाळ्यावर भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलला. टीम इंडियाच्या या दादाने जागतिक क्रिकेटमध्ये आपली 'दादागिरी' दाखवली. मैदानावरील आपल्या 'दादागिरी'ने गांगुली नेहमीच चर्चेत राहिले. आज या लेखात आपण पाहणार आहोत गांगुलीच्या 'दादागिरी'चे असेच काही किस्से त्याच्या सर्व चाहत्यांनी आनंद लुटला.
बऱ्याच काळापासून क्रिकेट विश्वात भारताला 'घर में शेर बाहेर ढेर' असे म्हटले जायचे. हे परदेशात भारतीय क्रिकेट संघाच्या (Indian Cricket Team) अपयशामुळे आणि भारतीय उपखंडातील यशामुळे होते, परंतु माजी कर्णधार आणि सध्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी कर्णधारपद सांभाळ्यावर भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलला. गांगुलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही सामने जिंकण्यास सुरुवात केली. तो एक असा कर्णधार होता ज्याने टीमला जिंकण्याची सवय लावली. गांगुलीला दादा असेही म्हणतात. टीम इंडियाच्या या दादाने जागतिक क्रिकेटमध्ये आपली 'दादागिरी' दाखवली. आज (8 जुलै) सौरव गांगुलीचा वाढदिवस असून तो 48 वर्षांचा झाला आहे. भारतीय क्रिकेटला नवीन उंचीवर नेणार्या या 'बंगाल टायगर'ची क्रिकेट कारकीर्द खूपच अनन्य राहिली आहे. गांगुली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. (सचिन तेंडुलकरने नेहमी पहिला बॉल खेळण्यास सौरव गांगुलीला भाग पाडले? माजी कर्णधाराने सांगितलेला धमाल किस्सा ऐकून तुम्हीही नक्कीच हसाल)
मैदानावरील आपल्या 'दादागिरी'ने गांगुली नेहमीच चर्चेत राहिले. आज या लेखात आपण पाहणार आहोत गांगुलीच्या 'दादागिरी'चे असेच काही किस्से त्याच्या सर्व चाहत्यांनी आनंद लुटला.
अँड्र्यू फ्लिंटॉफला 2002 मालिकेत त्याच्याच अंदाजात दिले उत्तर
भारतीय क्रिकेट चाहत्यांना आजही2002नॅटवेस्ट मालिकेतील फायनल सामना लक्षात आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडला पराभूत करून मालिका जिंकल्यावर बाल्कनीत उभा राहून दादाने आपला शर्ट काढला आणि हवेत अनेक वेळा फडकावला. हे त्याने या कारणाने केले की फ्लिंटॉफ 2002 वानखेडेमध्ये विजयानंतर शर्ट काढून पळाला होता, पण प्रतिकार करण्याची वेळ यंदा गांगुलीची होती. दादाच्या टीमने जेव्हा इंग्लंडमध्ये विजय मिळवला तेव्हा दादाने शर्ट कडून फ्लिंटॉफला त्याच्याच भाषेत उत्तर दिले.
हरभजन सिंहला संघात घेण्यावर ठाम होता गांगुली
2001 ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय निवडकर्ते हरभजन सिंहला टीममध्ये स्थान देऊ इच्छित नव्हते, पण गांगुली त्याला संघात ठेवण्यावर ठाम राहिला. "जो वर हरभजन माझ्या टीममध्ये येत नाही तो वर मी या खोलीतून बाहेर पडणार नाही," असे गांगुलीने ठामपणे सांगितले. अखेरीस निवडकर्त्यांना दादाचा हट्ट मान्य करावा लागला. शिवाय, भज्जीने गांगुलीचा विश्वास मोडला नाही. त्याने मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात हॅटट्रिक घेतली आणि फॉलोअन मिळाला असतानाही भारताने ऐतिहासिक विजय मिळवला.
स्टीव वॉला पाहायला लावली वाट
2001 वनडे मालिकेच्या एका सामन्यात गांगुलीने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉला टॉससाठी वाट पाहायला लावली होती. विजागमधील तिसर्या वनडे सामन्यात वॉ भारतीय कर्णधाराची टॉस साठी वाट पाहत असतानागांगुली टॉससाठी उशिरा आला. नंतर ऑस्ट्रेलियन संघाला धडा शिकवण्याच्या उद्देशाने त्याने हे काम जाणूनबुजून केल्याचे गांगुलीने नंतर उघड केले. गांगुलीने म्हटले, त्यावेळी ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जॉन बुचनन पूर्वीच्या वनडे सामन्यात माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथशीमैदानावर येत असताना उद्धटपणे बोलले होते.
दरम्यान, गांगुलीने कर्णधार म्हणून टीमला अशा ठिकाणी नेले की ते केवळ देशातच नव्हे तर देशाबाहेरही विजयासाठी ओळखले जात होते. गांगुलीच्या नेतृत्वात 2001 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 1983 नंतर टीम इंडियाने 2003 मध्ये वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. गांगुलीने 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरातील कसोटी मालिकेदरम्यान क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. 1996 लॉर्ड्स कसोटीपासून आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात करणाऱ्या गांगुलीने डेब्यू कसोटीत शतक ठोकले होते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)