Happy Birthday Prithvi Shaw: 13 व्या वर्षी केल्या 546 धावा, टेस्ट पदार्पणात शतक ठोकणाऱ्या 'वंडर बॉय' अर्थातच पृथ्वी शॉ याच्यबद्दलचे काही हटके किस्से
पदार्पणाच्या कसोटी सामन्यात 134 धावांची शानदार खेळी करणार्या पृथ्वी शॉ याच्याबद्दल क्रिकेट चाहत्यांना फारच माहिती असेल. टीम इंडियाचा हा 'वंडर बॉय' आज आपला 20 वा वाढदिवस साजरा करीत आहे. आज त्याच्या वाढदिवसाच्या खास प्रसंगावर जाणून घेऊया या 'वंडर बॉय'च्या आयुष्यातील काही मनोरंजक किस्से
पदार्पणाच्या कसोटी सामन्यात 134 धावांची शानदार खेळी करणार्या पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याच्याबद्दल क्रिकेट चाहत्यांना फारच माहिती असेल. 2018 मध्ये भारतीय क्रिकेट चाहत्यांना त्यांचा आगामी स्टार मिळाला, होय आम्ही बोलतोय पृथ्वी शॉबद्दल. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)याचा विक्रम मोडणाऱ्या पृथ्वीचा आज वाढदिवस आहे. 9 नोव्हेंबर 1999 मध्ये जन्मलेल्या पृथ्वीने पदार्पणाच्या पहिल्या टेस्ट सामन्यातच शतक झळकावत यंदा क्रिकेटविश्वात ओळख निर्माण केली. टीम इंडियाचा हा 'वंडर बॉय' (Wonder Boy) आज आपला 20 वा वाढदिवस साजरा करीत आहे. पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या पृथ्वीची सर्वत्र स्तुती केली, पण आज या जागी पोहचण्यासाठी पृथ्वी आणि त्याच्या नजीकच्या माणसांनी खासकरून त्याच्या वडिलांनी खूप मेहनत घेतली आहे. 2018 वर्ष पृथ्वीसाठी बर्याच कारणांसाठी संस्मरणीय राहीले कारण यावर्षी त्याने आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द केवळ सुरू केलीच नाही तर बर्याच विक्रमांनाही गवसणी घातली. (पृथ्वी शॉ याचे बंदीनंतर लवकरच होणार पुनरागमन, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी मुंबई संघात निवड होण्याची शक्यता)
भारतासाठी अंडर-19 विश्वचषक जिंकल्यावर मुंबईच्या या युवा खेळाडूने पुन्हा मागे वळून पहिले नाही. आणि इंडियन प्रेमिअर लीग (IPL) नंतर टीम इंडियासाठीही आपला प्रभावी खेळ करून दाखवला. आज त्याच्या वाढदिवसाच्या खास प्रसंगावर जाणून घेऊया या 'वंडर बॉय' च्या आयुष्यातील काही मनोरंजक किस्से:
1. पृथ्वीचे वडील पंकज शॉ (Pankaj Shaw) मूळचे बिहारमधील गया जिल्ह्यातील मानपूर गावचे आहेत. पण पृथ्वीचा जन्म मुंबईच्या विरार भागात झाला आणि त्याचा बिहारशी काही संबंध नाही. सध्या पृथ्वीचे वडील पंकज हेसुद्धा मुंबईत राहत आहेत. पृथ्वीच्या जन्मापूर्वीच ते मुंबईत शिफ्ट झाले आणि इथे त्यांनी कपड्यांचे दुकान काढले. पृथ्वीला आज अव्वल दर्जाचा क्रिकेटपटू बनवण्यामागे त्याच्या वडिलांनी कठीण परिश्रम केले.
2. वयाच्या अवघ्याचार वर्षाचा असताना पृथ्वीने त्याची आई गमावली. पृथ्वीचे वडील पंकज यांना हा मोठा धक्का होता. पत्नीचे निधन झाल्यानंतर पंकज यांनी पृथ्वीला क्रिकेट अकादमीमध्ये बसवले आणि मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर व्यतीत केले. पृथ्वीच्या वडिलांनी कपड्यांचे दुकान उघडले होते, जे सूरत आणि बडोदा पर्यंत लोकप्रिय झाले होते. मात्र, पृथ्वीचे क्रिकेट खेळण्याचे स्वप्न सत्यात करण्यासाठी पंकज यांनी त्यांचे दुकान विकले. बाप-लेकाकडे पैशाची कमतरता होती, परंतु दोघांनीही शांतता राखली आणि एक दिवसक्रिकेट त्यांची मेहनत सार्थक करेलअशी आशा करत राहिले.
3. 1999 मध्ये जन्मलेला पृथ्वी 2003 च्या हैरिस शील्ड क्रिकेट टूर्नामेंट (Harris Shielf Tournament) दरम्यान पाहिलांदा चर्चेत आला. 14 वर्षीय पृथ्वीने रिजवी स्प्रिंगफील्डसाठी खेळात सेंट फ्रांसिस डी’एस्सीविरुद्ध सामन्यात 330 चेंडूत 546 धावा केल्या. या सामन्यादरम्यान पृथ्वीने 85 चौकार आणि 5 षटकारही लागले.
4. भारताच्या अंडर-19 विश्वचषक विजेता कर्णधाराने आंतरराष्ट्रीय टेस्ट पदार्पणाच्या सामन्यात शतकी खेळी केली होत. त्याने राजकोटच्या मैदानावर विंडीजविरुद्ध 134 धावांची खेळी केली. इतकेच नाही तर पृथ्वीने रणजी आणि दुलीप ट्रॉफीच्या पारदर्पणच्या सामन्यात शतक करण्याच्या विक्रमाची नोंद केली आहे. 2017 रणजी ट्रॉफीच्या सेमीफायनल सामन्यात पदार्पण करत पृथ्वीने शतक केले, ज्यानंतर त्याला दुलीप ट्रॉफी खेळण्याची संधी मिळाली.
5. 2018 मध्ये झालेल्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने पृथ्वीच्या नेतृत्वात विजेतेपद पटकावले. यानंतर पृथ्वीची मागणी वाढू लागली आणि 2019 मध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) कडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. सलामी फलंदाज म्हणून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा पृथ्वी सर्वात कमी वयातील फलंदाज ठरला. इतकेच नाही तर, संजू सॅमसन (Sanju Samson) याच्या विक्रमाची बरोबरी करत वयाच्या 18 व्या वर्षी 169 दिवस अर्धशतक ठोकणारा तो सर्वात युवा फलंदाज ठरला. त्याशिवाय सर्वात कमी वयात अर्धशतक ठोकण्याच्या बाबतीतही तो संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे.
2018 मध्ये टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पृथ्वीची अनेकदा 'क्रिकेटचा देव' म्हटल्या जाणाऱ्या सचिनशी तुलनाही झाली. पण, त्याच्या जाणून बुजून न केलेल्या चुकीमुळे त्याच्यावर काही महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली. आता तो बॅन 16 नोव्हेंबरला पूर्ण होत आहे. आणि त्यानंतर पृथ्वी लवकरच क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करेल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)