Happy Birthday MS Dhoni: 'डॅडी कूल' महेंद्र सिंह धोनी आणि लेक झिवा यांचे हे हृदयस्पर्शी व्हिडिओज पाहून तुम्हीदेखील भावुक व्हाल, पहा (Video)
आणि ते पाहून तुम्ही देखील भावून व्हाल.
टीम इंडियाचा अनुभवी विकेटकीपर बॅट्समन महेंद्र सिंग धोनी रविवारी म्हणजेच 7 जुलैला 38 वर्षांचा होणार आहे. या वयातही त्याची चपळता युवा खेळाडूंना प्रेरणा देणारी आहे. धोनी कर्णधार असताना भारतीय संघाने यशाची अनेक नवनवीन शिखरे सर केली. मैदानावरील आपल्या शांत वृत्तीमुळे त्याला 'कॅप्टन कूल' म्हटले जाते. 2004 मध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि गेले दशकभर धोनी टीम इंडियाचा अविभाज्य भाग राहिला आहे. (IND vs SL मॅचआधी ICC ने शेअर केला एम एस धोनीसाठी स्पेशल व्हिडिओ, विराट कोहली सह या खेळाडूंनी केली प्रशंसा)
आपल्या क्रिकेट करिअर दरम्यान धोनीने मैदानावर आणि मैदानाबाहेर अनेकांची मनं जिंकली. पण, त्याच्यात एक प्रेमळ पितासुद्धा लपला आहे. 2015 विश्वचषक दरम्यान धोनीची लेक, झिवा हिचा जन्म झाला. तेव्हा धोनी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड आयोजित केलेले विश्वकप खेळण्यात व्यस्त होता. धोनी आपल्या करिअरप्रमाणेच वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यालाही तितकेच प्राधान्य देतो. आपली लेक, झिवाच्या जन्मानंतर धोनीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर कित्येक व्हिडिओज, फोटोज शेअर केले आहेत. आणि ते पाहून तुम्ही देखील भावून व्हाल.
आयपीएल असो किंवा वनडे सामना, झिवा आपल्या पप्पाला दरवेळी जोशात चिअर अप करताना दिसते. आज धोनीच्या वाढदिवस निमित्त आपण बघूया धोनी आणि झिवाचे काही हृदयस्पर्शी क्षण: