Happy Ganesh Chaturthi 2020: CSK, KKR म्हणाले-'गणपती बाप्पा मोरया'; फ्रँचायझी, खेळाडूंनी खास अंदाजात दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा (See Tweets)

या शिवाय रवि शास्त्री, माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यांच्यासह क्रिकेट विश्वातील सर्व सेलिब्रिटींनी गणेश चतुर्थीनिमित्त खास पोस्ट शेअर केल्या.

फ्रँचायझी, खेळाडूंनी खास अंदाजात दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा (Photo Credit: Twitter)

Happy Ganesh Chaturthi 2020: गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) आजच्या या शुभदिनी इंडियन प्रीमियर लीग फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि खेळाडूंननी ट्विटर सर्वांसाठी शुभेच्छा पोस्ट केल्या. आयपीएलच्या फ्रँचायझी (IPL Franchises) संघांनी त्यांच्या चाहत्यांचे गणेश चतुर्थीच्या अत्यंत क्रिएटिव्ह पद्धतीने शुभेच्छा दिल्या. चेन्नई सुपर किंग्जपासून (Chennai Super Kings) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरपर्यंत सर्व फ्रँचायझींनी त्यांच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून या खास उत्सवानिमित्त पोस्ट शेअर केल्या. या शिवाय रवि शास्त्री, माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यांच्यासह क्रिकेट विश्वातील सर्व सेलिब्रिटींनी गणेश चतुर्थीनिमित्त (Ganesh Chaturthi) खास पोस्ट शेअर केल्या. कोलकाता नाइट रायडर्सने एक पोस्ट शेअर केले आणि लिहिले की “गणेश चतुर्थीच्या शुभ प्रसंगाच्या हार्दिक शुभेच्छा, भगवान तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना आनंद देवो! गणपती बाप्पा मोरया." (Ganesh Chaturthi 2020: गणेश चतुर्थी निमित्त पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दुर्वांची आकर्षक आरास; गाभाऱ्यात साकारले अष्टविनायकांचे रुप View Photos)

कोलकाता नाइट रायडर्स

या शुभदिनी चेन्नई सुपर किंग्जनेही एक खास पोस्ट शेअर केली. पोस्ट शेअर करताना सीएसकेने लिहिले की “या दिवसाला चांगली सुरुवात आणि मोठा डाव मिळो!"

'तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा!', मुंबई इंडियनने कर्णधार रोहित शर्माच्या हाती बाप्पाच्या मुर्ती असलेला फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या.

आरसीबीने थेट युएईमधून शुभेच्छा पाठवल्या. "युएईमधून प्रत्येकास खूप शुभेच्छा, गणेश चतुर्थी साजरा करणाऱ्यांना शुभेच्छा!

या गणेश चतुर्थी, भगवान गणेश तुम्हाला सुरक्षित ठेवो आणि तुम्हाला आरोग्य आणि समृध्दी देवो, अशी प्रार्थना दिल्ली कॅपिटल्सने केली.

'नवीन सुरुवात करण्यासाठी, नवीन सीझन, आयपीएल 2020, गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा', सनरायझर्स हैदराबादने लिहिले.

रवि शास्त्री 

वीरेंद्र सेहवाग

कृणाल पांड्या

शिखर धवन

भारतीय हिंदूंमध्ये भगवान गणेश सर्वात पूजले जाणारे देवता आहेत. विनायक किंवा गणपती म्हणूनही ओळखले जाणारे श्री गणेश प्रथमपुज्य देवता आहे. देशभर, विशेषत: महाराष्ट्रात गणेश चतुर्थी हा सण भव्य आणि मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गणेश चतुर्थी साजरी करण्यासाठी देशभरातील भाविक दरवर्षी एकत्र येतात, तथापि, यावर्षी कोरोना पसरला असल्याने यंदा चित्र मात्र काहीसे वेगळे असणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif