Video: न्यूझीलंडविरुद्ध अनधिकृत टेस्ट सामन्यात भारत A चा हनुमा विहारी विचित्र पद्धतीने आऊट झालेले पाहून सर्व राहिले अवाक

त्याने स्वीप शॉट खेळला आणि शॉर्ट लेगवर उभे असलेल्या खेळाडूच्या पायाला लागून चेंडू विकेटकीपरच्या दिशेने गेला. विकेटकीपरने सहज झेल पकडला.

हनुमा विहारी (Photo Credits: Getty Images)

हनुमा विहारी (Hanuma Vihari) सध्या भारतीय संघातील (Indian Team) स्वीप शॉट खेळणाऱ्या एक चांगलाफलंदाजांपैकी आहे. पण त्याच स्वीप शॉटमुले गुरुवारी हॅग्ली ओव्हल येथे न्यूझीलंड ए (New Zealand A) विरुद्ध अनधिकृत टेस्ट सामन्यात त्याला पॅव्हिलिअनमध्ये परतावे लागले. सीनियर भारतीय संघासह भारत अ (India A) संघ देखील न्यूझीलंडच्या दौर्‍यावर आहे. इंडिया अ आणि न्यूझीलंड दरम्यान 2 दिवसांची अनधिकृत टेस्ट सीरीजची खेळली जात आहे. मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारत-अ 216 धावांवर ऑलआऊट झाला, तर न्यूझीलंड अ संघाने दिवसाचा खेळ संपला तेव्हा 2 बाद 105 धावा केल्या. यापूर्वी या दोन संघांदरम्यान तीन सामन्यांची अनधिकृत वनडे मालिकाही खेळली गेली होती, जी न्यूझीलंड-अ ने 2-1 ने जिंकली होती. सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारत-एचा फलंदाज हनुमा विहारी अतिशय विचित्र पद्धतीने बाद झाला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (IND vs NZ ODI 2020: दुखापतीने परेशान न्यूझीलंडने भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी केली संघाची घोषणा, 'या' युवा खेळाडू मिळाली संधी)

त्याने स्वीप शॉट खेळला आणि शॉर्ट लेगवर उभे असलेल्या खेळाडूच्या पायाला लागून चेंडू विकेटकीपरच्या दिशेने गेला. विकेटकीपरने सहज झेल पकडला अशाप्रकारे विचित्र मार्गाने भारत अ संघाचा कर्णधार विहारीला त्याची विकेट गमवावी लागली. विहारीला मॅकोन्चीने 51 धावांवर बाद केले. पाहा हा व्हिडिओ:

न्यूझीलंडच्या संघाने सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिले बॅटिंग करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती आणि त्यांचा सलामी फलंदाज मयंक अगरवाल एकही धाव न करता पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतरही भारत अ संघाला पुनरागमन करता आले नाही आणि नियमित अंतराने ते विकेट गमावल्या. शुभमन गिलने 83 धावा फटकावल्या पण या दोघांखेरीज दुसरा कोणताही फलंदाज प्रभावी खेळू करू शकला नाही आणि भारत-ए 216 धावांवर ऑलआऊट झाला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif